पंतप्रधान मोदींनी दलाई लामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चीनला दिला सूचक इशारा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तिबटचे सर्वोच्च धार्मीक नेते दलाई लामा यांना त्यांच्या ८६ व्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी लामा यांना जाहीर शुभेच्छा देत एकप्रकारे चीनला सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे.PM modi gave signal to china

गेल्या काही वर्षांत कोणत्याही भारतीय नेत्याने लामा यांना अशा प्रकारे शुभेच्छा दिलेल्या नाहीत. लामा यांना शुभेच्छा देण्याने चीन संतप्त होवू शकतो याची जाणीव असल्याने भारतीय ते लामा यांच्यापासून चार हात लांब रहात असत.


पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात आठ महिला बनल्या राज्यपाल ; इतर राजवटीपेक्षा संख्या अधिक


पण मोदी यांनी यावेळी परंपरेला फाटा दिल्याचे मानले जाते. जागतिक राजकारणात आता रत पुन्हा अमेरिकेच्या जवळ जावू लागल्याचे हे संकेत आहेत. गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, चीन आणि तिबेटी नागरिकांमधील संघर्ष सोडविण्यात दलाई लामा यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे चीन सरकारने मान्य करावे आणि कोणतीही पूर्वअट न घालता त्यांना चर्चेसाठी आमंत्रण द्यावे, असे आवाहन विजनवासातील तिबेटी सरकारचे अध्यक्ष पेन्पा त्सेरिंग यांनी केले. दलाई लामा यांच्या ८६ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

PM modi gave signal to china

महत्त्वाच्या बातम्या