पाकिस्तान बुडाला अंधारात, सततच्या लोड शेडिंगमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कमाल तापमानात वाढ झालेली असताना वीज टंचाईचाही सामना करावा लागत आहे. लाहोरमध्ये चोवीस तासापर्यंत लोकांना वीजेविना राहवे लागत आहे. अनेक ठिकाणी १६-१६ तास विजेविना राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहेPakistan facing power shortage

. परिणामी संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी टायर जाळण्याचे प्रकारही घडले आहे.लाहोरसह मुलतान, गुजरानवालासह पंजाब प्रांतातील असंख्य नागरिक त्रस्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत. सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत.



पाकिस्तानलाही भीषण उष्णतेचा सामना करावा लागत आहे. अशावेळी वीज नसल्याने नागरिक आणखीच हवालदिल झाले आहेत. सरकारला लोडशेडिंग वाढवावे लागत असून त्याचा कालावधी १६-१६ तासापर्यंत ठेवण्यात येत आहे.

पाकिस्तानातील ठराविक ठिकाणीच वीजपुरवठा होत आहे. दुसरीकडे मात्र नागरिकांना अंधारात राहवे लागत आहे. वीज टंचाईमुळे संतापलेल्या नागरिकांनी गुजरानवाला इलेक्ट्रिक पॉवर कंपनी आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

पंजाबच्या बहुतांश शहरात सहा ते आठ तासापर्यंत लोडशेडिंग होत आहे. यात लोधरन, बहावलपूर, बहावलनगराचा समावेश आहे. त्याचवेळी ग्रामीण भागात १० ते १२ तास लोडशेडिंग होत आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी टायर जाळून वाहतुकीत अडथळे आणले आहेत.

Pakistan facing power shortage

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात