अमेरिकेत आता प्राणिसंग्रहालयातील वाघ व अस्वलांनादेखील कोरोनावरील लस

विशेष प्रतिनिधी

सॅनफ्रान्सिस्को : ‘सॅनफ्रान्सिस्कोच्या बे एरियामधील प्राणिसंग्रहालयातील वाघ, अस्वले आदी प्राण्यांना प्रायोगिक तत्त्वावरील लस देण्यात आली. ऑकलंड प्राणिसंग्रहालयातील ‘जिंजर व ‘मोली’ नावाच्या वाघांना प्रथमच लस देण्यात आली, अशी माहिती येथील एक वृत्तपत्राने दिली. animals also vaccinated in USA

कोरोनाच्या साथीत पशुपक्ष्यां चे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील मोहिमेअंतर्गत येथील अमेरिकेतील काही प्राणिसंग्रहालयात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.


कोलकत्यातील बनावट लसीकरणाविरोधात भाजपचा मोर्चा, पोलिसांशी बाचाबाची


न्यूजर्सीमधील झोयटी या पशुऔषध निर्माण कंपनीने लस विकसित केलेली लस उद्यानांना देणगीदाखल दिली आहे. या प्राणिसंग्रहालयातील एकाही प्राण्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे लसीकरण सुरू केले आहे, असे येथील पशुसेवा उपाध्यक्षांनी सांगितले. सर्वांत आधी वाघ, अस्वले, सिंह आणि फेरेट यांना लशीचा पहिला किंवा दुसरा डोस देण्यात आला आहे. पुढे वानरे व डुकरांना लस दिली जाणार आहे.

animals also vaccinated in USA

महत्त्वाच्या बातम्या