पंतप्रधानांची आठ वर्षांची मैत्रीण करतेय वृक्षारोपणासाठी जनजागृती, चिमुरडीने आत्तापर्यंत लावली सात हजार झाडे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठ वर्षांची मैत्रीण एका ध्येयाने काम करत आहे. वृक्षारोपणाचे महत्व देशभर पटवून देत आहे. अवघे आठ वर्षे वय पण तिने एकटीने आत्तापर्यंत सात हजार झाडे लावली आहेत. दर रविवारी पाच झाडे लावण्याचा तिचा संकल्प आहे. याशिवाय विशिष्ट दिवशी शेकडो झाडे लावते.Seven year old girl has planted 7,000 trees so far, raising awareness for tree planting

मीरतची आयहा दीक्षित ही चिमुकली. एक व्यंगचित्र पाहिले आणि तिला वृक्षारोपणाची प्रेरणा मिळाली. मानवी संस्कृती वाचवण्याची ही आपली शेवटची संधी आहे, झाडे लावणे एकमेव मार्ग आहे, असे म्हणत आयहाने झाडे लावायला सुरूवात केली. आयपीएस अधिकारी होण्याचे ध्येय असले तरी आयुष्यभर झाडे लावत राहावी अशी आयहाची इच्छा आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयहाला २०१९ मध्ये पंतप्रधान राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी पंतप्रधांनी आयहाला आल्याने आपली तरुण मित्र म्हटले होते. पंतप्रधानांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आयहासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता.

पंतप्रधानांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराने आयहाचे बळ आणखी वाढले आहे. चौथीतील आयहा आता देशभर प्रवास करत आहेत. दिल्ली, जयपूर, इंदूर, गाझियाबाद यासह अनेक शहरांमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात आयहाला निमंत्रित करण्यात आले होते. आता तर ती स्वत: च्या विविध वनस्पतींचे बियाणे विकसित करते आणि ती जनतेत वितरीत करते.

आयहाचे वडील कुलदीप दीक्षित हे स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षक आहेत. ते म्हणाले, कार्टून्सने आयहावर इतका प्रभाव पडला की केवळ चार वर्षांची असताना तिने झाडे लावायचा हट्ट केला. मग मी एक दिवस तिला जवळच्या उद्यानामध्ये नेले आणि लिंबाची रोपे लावण्यास मदत केली.

त्यानंतर दरच रविवारी तिने झाडे लावायला सुरूवात केली. तिची आवड पाहून आम्ही २०१८ मध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. इतर मुलेही त्यात सहभागी होती. गृहनिर्माण व विकास मंडळाने एक साइट उपलब्ध करुन दिली होती.

तेथे दोन दिवसांत हजारांवर झाडे लावली. मुख्य मुद्दा होता झाडांची जोपासना करण्याचा. आम्ही तेही केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमध्ये आयहाचा उल्लेख केला होता.

Seven year old girl has planted 7,000 trees so far, raising awareness for tree planting

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात