फ्लाइंग कारच्या यशस्वी चाचणीने वाहन क्षेत्रात येणार आधुनिक क्रांती


वृत्तसंस्था

नित्रा (स्लोव्हाकिया) : स्लोव्हाकियाच्या क्लेईन व्हीजन कंपनीने उडणारी मोटार विकसित केली आहे. या फ्लाइंग कारची यशस्वी चाचणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान केवळ दोन मिनिटातच मोटारीने विमानाचे रुप धारण करताना दिसून आली. Flaying car test succesful

स्लोव्हाकियाच्या नित्रा आणि ब्रात्सिलव्हा या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान नुकतीच एअर कारची ३५ मिनिटांची यशस्वी चाचणी घेतली. ही मोटार अचानक विमानाचे रुप धारण करते. ही हायब्रीड मोटार एअरक्राफ्ट, एयरकार, बीएमडल्ब्ल्यू इंजिनने तयार केली असून ती नियमित पेट्रोलने चालते. ही मोटार १ हजार किलोमीटर, ८२०० फूट उंचीपर्यंत उड्डाण भरू शकते. हवेत ही मोटार चाळीस तास प्रवास करू शकते. या मोटारीस विमानात बदल करण्यासाठी केवळ २ मिनिटे १५ सेकंदाचा कालावधी लागतो.



हवेत असताना ही मोटार १७० किलोमीटर प्रती तास वेगाने धावत होती. विशेष म्हणजे यात २०० किलोग्रॅम वजनासह दोन नागरिक प्रवास करू शकतात. ड्रोन टॅक्सी मॉडेलप्रमाणे ही मोटार जागेवरुनच उड्डाण करु शकत नाही. त्यामुळे तिला धावपट्टीची गरज असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.

Flaying car test succesful

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात