पीएम मोदींकडून इस्रायलचे नवे पीएम नेफ्टाली बेनेट यांना शुभेच्छा, म्हणाले- तुम्हाला भेटण्याची उत्सुकता!

pm modi congratulates israel new prime minister naftali bennett

prime minister naftali bennett : इस्रायलच्या राजकीय इतिहासामध्ये एक नवीन पर्व सुरू झाले आहे. बेंजामिन नेतान्याहू यांच्या जागी नेफ्ताली बेनेट आता इस्रायलचे नवीन पंतप्रधान झाले आहेत. रविवारी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नेफ्ताली बेनेट यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेफ्ताली यांना पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, पुढच्या वर्षी आपण राजनैतिक संबंधांच्या उन्नतीच्या 30 वर्षांचा उत्सव साजरा करू, तेव्हा मी तुम्हाला भेटण्यास आणि दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारीत आणखी सुधारणा करण्यास उत्सुक आहे. pm modi congratulates israel new prime minister naftali bennett


विशेष प्रतिनिधी

जेरुसलेम : इस्रायलच्या राजकीय इतिहासामध्ये एक नवीन पर्व सुरू झाले आहे. बेंजामिन नेतान्याहू यांच्या जागी नेफ्ताली बेनेट आता इस्रायलचे नवीन पंतप्रधान झाले आहेत. रविवारी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नेफ्ताली बेनेट यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेफ्ताली यांना पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, पुढच्या वर्षी आपण राजनैतिक संबंधांच्या उन्नतीच्या 30 वर्षांचा उत्सव साजरा करू, तेव्हा मी तुम्हाला भेटण्यास आणि दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारीत आणखी सुधारणा करण्यास उत्सुक आहे.

बायडेन यांनीही केले अभिनंदन

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही नेफ्ताली बेनेट यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिका आता नेफ्ताली बेनेटबरोबर काम करण्यास खूप उत्सुक आहे. बायडेन पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या जनतेच्या वतीने मी नेफ्ताली बेनेट आणि राज्य सचिव जॅर लॅपिड यांचे अभिनंदन करतो, आम्ही दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी कार्य करू.

नेफ्ताली कट्टर विचारसरणीचे नेते

नेफ्ताली बेनेट यांनी इस्रायलमधील बेंजामिन नेतान्याहू यांचा 12 वर्षांचे शासन संपुष्टात आणले आहे. बेंजामिन नेतान्याहू बरेच प्रयत्न करूनही आपली सत्ता वाचवू शकले नाहीत. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नेफ्ताली बेनेट यांनी जाहीर केले की, आम्ही देशातील वेगवेगळ्या विचारांच्या लोकांसोबत काम करू. नेफ्ताली हे कट्टर विचारसरणीची नेते मानले जातात.

कोण आहेत नेफ्ताली बेनेट?

इस्रायलची नवे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांनी सैन्यात एलिट कमांडो युनिट सायरेत मटकल आणि मगलनच्या कमांडोच्या रूपात देशसेवा केली आहे. 2006 मध्ये त्यांनी बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वात राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना नेतान्याहूंचे चीफ ऑफ स्टाफ बनविण्यात आले. 2012 मध्ये नेफ्ताली बेनेट द ज्यूइश होम नावाच्या पक्षातर्फे संसदेत निवडून गेले.

नंतर ते न्यू राईट अँड यामिना पार्टीचे नेसेटचे सदस्यही झाले. 2012 ते 2020 दरम्यान नेफ्ताली पाच वेळा इस्त्रायली संसदेची सदस्य राहिले. 2019 ते 2020 पर्यंत ते इस्रायलचे संरक्षणमंत्रीदेखील राहिले आहेत.

pm modi congratulates israel new prime minister naftali bennett

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी