इंधन दराचा भडका सुरूच : देशात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, जाणून घ्या नव्या किमती


देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. देशात आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आजही पेट्रोल आणि डिझेल 34-35 पैशांनी महागले आहे. दिल्लीत आज एक लिटर पेट्रोलची किंमत 108.99 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 97.72 रुपये झाली आहे. Petrol Diesel Price Today Petrol Diesel Price Hike Know New Rate Of Your City


वृत्तसंस्था

मुंबई : देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. देशात आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आजही पेट्रोल आणि डिझेल 34-35 पैशांनी महागले आहे. दिल्लीत आज एक लिटर पेट्रोलची किंमत 108.99 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 97.72 रुपये झाली आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी विक्रमी पातळी गाठली आहे. येथे पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी वाढले आहे. त्यानंतर एक लिटर पेट्रोलची किंमत 109.46 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 100.84 रुपये झाली आहे.

मुंबई-चेन्नईतील नवे दर

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 114.81 रुपये आहे. त्याच वेळी, एक लिटर डिझेल 105.86 रुपयांना उपलब्ध आहे. त्याच वेळी, दक्षिणेकडील चेन्नई राज्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 105.74 रुपये आहे. तर एक लिटर डिझेल 101.92 रुपयांना उपलब्ध आहे.

मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये एक लिटर पेट्रोल १२०.०६ रुपयांना

छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील शेवटचा जिल्हा बालाघाटमध्ये पेट्रोलच्या दराने नवा विक्रम केला आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 120.06 रुपये आहे, तर एक लिटर डिझेलसाठी 109.32 रुपये मोजावे लागतात.

Petrol Diesel Price Today Petrol Diesel Price Hike Know New Rate Of Your City

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात