विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी – आसाममध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दलदल असलेल्या एका तलावात अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूपरित्या बाहेर काढले.People saved five elphants
मेघालय सीमेलगत असलेल्या गोलपारा जिल्ह्यात चोईबाडी भागात बुधवारी रात्री हत्तीचा एक कळप तलावात फसला होता. यासंदर्भातील माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दोन ग्रामस्थांनी दलदल असलेल्या तलावाचा काठावर खोदकाम केले आणि त्यामुळे हत्तींना बाहेर येण्यास सोपे झाले.पाच हत्तींचा कळप हा मेघालयाच्या जंगलातून आसाममध्ये आला असावा, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यादरम्यान, आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेने दोन हत्तींचा मृत्यू झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App