पंकजा मुंडे बोलून दाखविली खदखद आणि मोदी – शहा – नड्डांना नेता म्हणायचीही केली कसरत


प्रतिनिधी

मुंबई – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रीय चिटणीसांच्या बैठकीतून परतल्यानंतर आज आपल्या समर्थकांना भेटल्या. त्यांनी समर्थकांनी दिलेले सगळे राजीनामे नाकारले. त्यावेळी त्यांनी आवेशपूर्ण भाषण केले. धर्मयुध्द टाळण्यासाठी मी उभी आहे, असे त्या म्हणाल्या. कौरव – पांडवांच्या युध्दाचा उल्लेख त्यांनी केला. आपली सगळी खदखद त्यांनी बोलून दाखविली. त्याचवेळी त्यांनी मोदी – शहा – नड्डांना नेते म्हणायची कसरतही करून दाखविली. Pankaja munde speaks out her unhappyness again but said modi, shah, nadda are my leaders

पंकजा मुंडे म्हणाल्या, की मी कुणाला भीत नाही, पण मी आदरही करते. निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. मी माझ्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या व्यक्तींचा मी अनादर केला नाही. मी निर्भय आहे ते तुमच्याच जीवावर. कौरव आणि पांडवांचे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावे. कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातीर्थी पडत आहेत. कोणताही माणूस कोणताही निर्णय घेतो, तो लाभार्थी असतो. मी सगळ्या पक्षांच्या याद्या बघितल्या, तर एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. पण मला माझ्यासाठी नकोय, तुमच्यासाठी हवे आहे. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझे ऐका. आपण कष्टाने बनवलेले घर का सोडायचे?? ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.माझा नेते मोदी… माझा नेता अमित शाह… माझा नेता जे.पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. मला माझ्यासाठी काही नकोय. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला भाजपाने अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणे शक्य नाही. मी म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचे नाव आले, काय बिघडले? मी कोण आहे… तुम्ही तर प्रोटोकॉलने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला सजवण्याचा प्रयत्न करू नका”, अशा शब्दांमध्ये पंकजांनी संतप्त कार्यकर्त्यांना समजावले.

आपल्या जीवनातील स्पिरीट असेच ठेवा. मी न बोलताही तुम्हाला कळले. तुमचेही मला कळलेलं नाही. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. मला संधी मिळाली असती, तर मी भागवत कराड यांच्या शपथविधीलाही गेले असते. ऊसाच्या फडात काम करणाऱ्या माणसाला सभापती बनवलेले आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या मंत्रिपदापेक्षा मला हे महत्त्वाचे आहे. गरीब माणूस बाजार समितीचा सभापती असल्याचा मला अभिमान वाटतो. वंचितांचा वाली बनण्याचे आपले स्वप्न आहे. इथे आता राम नाही, असे ज्यादिवशी वाटेल, त्यादिवशी बघू”, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आपली खदखद देखील बोलून दाखविली.

Pankaja munde speaks out her unhappyness again but said modi, shah, nadda are my leaders

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण