माजी पॉर्न स्टार असलेल्या मिया खलिफाच्या टिकटॉक अकाऊंटवर पाकिस्तानने बंदी आणली आहे. कोणतीही अधिकृत घोषणा न करता पीटीएने मिया खलिफाचं अकाऊंट बंद केलं आहे. या मागचं कोणतही कारण पीटीएने स्पष्ट केलेलं नाही.Pakistan shuts down porn star Mia Khalifa’s Tiktok account
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : माजी पॉर्न स्टार असलेल्या मिया खलिफाच्या टिकटॉक अकाऊंटवर पाकिस्तानने बंदी आणली आहे. कोणतीही अधिकृत घोषणा न करता पीटीएने मिया खलिफाचं अकाऊंट बंद केलं आहे. या मागचं कोणतही कारण पीटीएने स्पष्ट केलेलं नाही.
पाकिस्तानने या आधी दोन वेळा टिकटॉक अॅपवर बंदी आणली आणि ती पुन्हा हटवली. पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटीने टिकटॉक अॅप सेन्सॉर करण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब सुरु केला आहे. यानुसार ठराविक व्यक्तीच्या अकाऊंटवर बंदी आणली जाते.
मियाचं अकाऊंट बंद झाल्यानंतर तिच्या चाहत्यांनी ट्विटरवर गोंधळ घातला. मियाच्या टिकटॉक अकाऊंटवर कंन्टेट न दिसल्याने त्यांनी ट्विटवरुन प्रश्न उपस्थित केले. अकाऊंट बंद झाल्यानंतर मियाने ट्विटरवरुन एक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या टिकटॉक अकाऊंटवर देशात बंदी घातल्याने पाकिस्तानबद्दल आवाज उठवला पाहिजे. माझे सर्व टिकटॉक व्हिडीओ मी चाहत्यांसाठी ट्विटरवर शेअर करत आहे. तर मियाच्या या ट्विटला अनेकांनी समर्थन देत पीटीएच्या कारवाईवर आक्षेप घेतलाय.
सोशल मीडियावरुन मियाला अनेक नेटकºयांनी पाठिंबा दिला आहे. पाकिस्तान सरकार इतर महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत मियाच्या बंदीकडे जास्त लक्ष देत असल्याचा आरोप होत आहे.देश विदेशातील अनेक घडामोडींवर मिया खलिफाने सोशल मीडियावर तिची मते मांडत असते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App