Watch Video Congress in Kerala pour black oil on a cut-out of Sachin Tendulkar in Kochi

काँग्रेसचं काळं कृत्य, एकजुटीचा संदेश देणाऱ्या भारतरत्न सचिनचा अवमान; रिहाना, मिया खलिफाचा मात्र गौरव!

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी शेतकरी आंदोलनावर ट्वीट करून देशाला एकजुटीचे आवाहन केले, ते काँग्रेसला सहन झालेले नाही. आधी माजी टेनिस स्टार मारिया शारापोव्हाला ट्वीट करून तिची माफी मागण्याचा ढोंगीपणा करण्यात आला, आता भारतरत्न सचिनच्या पोस्टरवर काळी शाई ओतून काँग्रेसने आपले काळे हेतू स्पष्ट केले आहेत. Watch Video Congress in Kerala pour black oil on a cut-out of Sachin Tendulkar in Kochi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात मागच्या अडीच महिन्यांपासून पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेले आहे. या आंदोलनाचे निमित्त करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न जोरदारपणे सुरू आहे. परदेशी कलाकारांना पैसे देऊन या प्रकरणावर ट्वीट करून घेतली जात आहेत, याचे खुलासे आता केंद्रीय तपास संस्थांच्या चौकशीतून होऊ लागले आहेत.

या परकीय शक्तींच्या विरोधात अनेक भारतीय सेलिब्रिटीजनी देशवासीयांना एकजुटीचे आवाहन केले आहे. परंतु हेच काँग्रेसला सहन होताना दिसत नाहीये. काँग्रेसने तथ्य नाकारून आंदोलन चिघळवण्याचे ठरवल्याचे दिसून येते. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी शेतकरी आंदोलनावर ट्वीट करून देशाला एकजुटीचे आवाहन केले, ते काँग्रेसला सहन झालेले नाही. आधी माजी टेनिस स्टार मारिया शारापोव्हाला ट्वीट करून तिची माफी मागण्याचा ढोंगीपणा करण्यात आला, आता भारतरत्न सचिनच्या पोस्टरवर काळी शाई ओतून काँग्रेसने आपले काळे हेतू स्पष्ट केले आहेत.वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केला व्हिडिओ

भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी काँग्रेसच्या या कृत्यावर तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवत ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, “काँग्रेसच्या या कृत्याचे वर्णन करण्यासाठी केवळ एक शब्द पुरेसा आहे – थर्ड क्लास! अतिशय हीन पातळीवर जाऊन त्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा अवमान केला आहे. उलट रिहाना, ग्रेटा, मिया खलिफा सारख्यांचा गौरव केला आहे. हा तोच पक्ष आहे, ज्याने भरदिवसा गायींची कत्तल केली.”

दिग्गज सचिन तेंडुलकर यांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाहेरचे लोक प्रेक्षक बनू शकतात, परंतु भागीदार मुळीच बनू शकत नाहीत. भारतीय नागरिकांना भारताबद्दल चांगली माहिती आहे. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट राहूया.” या ट्वीटमध्ये काँग्रेसला नेमके काय खटकले हे कळायला मार्ग नाही. भारताचे सार्वभौमत्व, एकजुटीचे आवाहन खटकले का, असा सवाल काँग्रेसला विचारण्याची वेळ आता आली आहे.

Watch Video Congress in Kerala pour black oil on a cut-out of Sachin Tendulkar in Kochi

Watch Video Congress in Kerala pour black oil on a cut-out of Sachin Tendulkar in Kochi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*