पहाडासारखा पैलवान पोलीस कोठडीत ढसाढसा रडला, सुशील कुमारला पोलीसांनी दाखविला खाक्या


पहाडासारखा माणूस, कुस्तीच्या मैदानात आडदांड पैलवानांना लोळवणारा, दोनदा ऑलिम्पिक पदक आणि कॉमनवेल्थमध्ये तीनदा सुवर्णपदक मिळवणारा हरियाणाचा कुस्तीपटू सुशील कुमार पोलिसी खाक्या दिसल्यावर पोलीस कोठडीत ढसाढसा रडला. Mountain-like wrestler cried in police cell, Sushil Kumar was shown khakis by police


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पहाडासारखा माणूस, कुस्तीच्या मैदानात आडदांड पैलवानांना लोळवणारा, दोनदा ऑलिम्पिक पदक आणि कॉमनवेल्थमध्ये तिनदा सुवर्णपदक मिळवणारा हरियाणाचा कुस्तीपटू सुशील कुमार पोलिसी खाक्या दिसल्यावर पोलीस कोठडीत ढसाढसा रडला.

कुस्तीपटू सागर धनखर हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या फरार सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि इथूनच पोलिसांनी आपला खाक्या दाखवत तपासाची चक्रं वेगानं फिरवायला सुरुवात केली. 38 वर्षीय कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात पोलिसांनी अजामिनपात्र वॉरंट काढलं होतं. मात्र, काही दिवस सुशील कुमार फरार राहिला. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत कठोरपणे चौकशी केली. दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने पोलिसी खाक्या दाखवला. यावेळी त्याच्यावर रडण्याची वेळ आली. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमार आणि सहआरोपी त्याचा मित्र अजय बक्करवाला यांना तीन ठिकाणी नेऊन चौकशी करण्यात आली. यात मॉडल टाऊन, शालीमार बाग आणि छत्रसाल स्टेडियम या ठिकाणांचा समावेश आहे.



दिल्ली पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगल तपासत आहेत. जेथे हत्या झाली तेथेही पोलीस सुशील कुमारला घेऊन गेले. सुशील कुमार आणि त्याचे सहकारी छत्रसाल स्टेडियमवरुन पीडित कुस्तीपटू सागर धनखर आणि सोनूला मॉडल टाऊनमधील एका फ्लॅटमध्ये घेऊन आले होते. पोलिसांनी आरोपींना तेथे नेऊन चौकशी केली. सुशील कुमार राहत असलेल्या शालीमार येथील फ्लॅटवर नेऊनही चौकशी झाली.

सुशील कुमारने छत्रसाल स्टेडियमवर झालेली घटना मान्य केलीय. मात्र, आपण केवळ दोन गटात झालेल्या वादात त्यांना वाचवत होतो, असा दावा सुशील कुमारने केला. याशिवाय सागर धनखर आणि सोनूला फ्लॅटवर आणण्याबाबत कबुली दिली नाही. गुन्हा करताना सुशील कुमारने वापरलेली गाडी आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकही घटनास्थळावर पोहचलं.

सुशील कुमारने काही गँगस्टरसोबत छत्रसालच्या स्टेडियमच्या बेसमेंटला सागरला बेदम मारहाण केली. तसेच याचा व्हिडीओ देखील शूट केला. हा व्हिडीओ दाखवून आपल्या वाट्याला गेल्यावर आपण काय करतो हे दाखवत त्याला लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा त्यांचा हेतू होता. पीडित सागरला इतकी जबर मारहाण झाली की घटनास्थळावर पोलीस पोहेचेपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे पोलिसांना सागरचा जबाब देखील घेता आला नाही. पीडित सागरच्या दोन मित्रांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय.

सागरच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांचे निळे निशान होते. डोक्यापासून गुडघ्यापर्यंत जखमा होत्या. शरीरावर धारदार वस्तूने हल्ला केल्याचे पोस्टमॉर्टममध्ये समोर आले आहे. कारण त्याच शरीरावर १ ते ४ सेंटीमीटर खोल जखमा आढळल्या. ही जखम इतकी खोल होती की हाडापर्यंत जखम झाली होती.

Mountain-like wrestler cried in police cell, Sushil Kumar was shown khakis by police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात