PAKISTAN : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदसह सहा जणांची निर्दोष मुक्तता; लाहोर कोर्टाचा निकाल


लाहोर उच्च न्यायालयाने हाफिज सईदसह जमात-उद-दावाच्या सहा नेत्यांना दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याप्रकरणी निर्दोष मुक्त केले आहे. तसेच न्यायालयाने शनिवारी ट्रायल कोर्टाने या सहा जणांना सुनावलेली शिक्षा देखील रद्द केली आहे. यासंदर्भात पाकिस्तान मीडियाच्या हवाल्याने एएनआयने वृत्त दिलंय. सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे. जमात-उद-दावा ही संघटना २००८च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असून या हल्ल्यात सहा अमेरिकी लोकांसह १६६ लोक मारले गेले होते. Pakistan acquits Mumbai attack mastermind Hafiz Saeed’s six aides in terror financing case


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदची संघटना जमात-उद-दावाच्या ६ साथीदारांची लाहोर उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी पोलीस आरोप सिद्ध करण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात येत असल्याचे शनिवारी मुख्य न्यायाधीश मोहम्मद अमीर भाटी आणि न्यायमूर्ती तारिक सलीम शेख यांच्या खंडपीठाकडून सांगितले जात आहे.

जमात-उद-दावाच्या ६ साथीदारांविरोदर सीटीडी एफआयआरमध्ये ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द करत, दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपातून संघटनेच्या नेत्यांची निर्दोष मुक्तता करत न्यायालयाने या सहा जणांना सुनावलेली शिक्षाही रद्द केली आहे. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये सहा अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. सईदच्या नेतृत्वाखालील जेयूडीचे लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचेही उघड झाले होते. मात्र हाफिज सईदचा जमात-उद प्रकरणी त्याचा ‘प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबाशी कोणताही संबंध नसल्याचे, न्यायालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. कारण खटल्यातील फिर्यादी अपीलकर्त्यांवर संशयापलीकडे आरोप स्थापित करण्यात अयशस्वी ठरले असल्याचे सांगत, शनिवारी मुख्य न्यायाधीश मोहम्मद अमीर भाटी आणि न्यायमूर्ती तारिक सलीम शेख यांच्या खंडपीठाने जमात-उद-दावाच्या ६ नेत्यांविरुद्ध सीटीडी एफआयआरमध्ये ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द केला.



दरम्यान, कडेकोट बंदोबस्तात या नेत्यांना एलएचसीमध्ये आणण्यात आले होते. त्याला लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात ठेवण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने ६ नेत्यांना ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यामध्ये प्रोफेसर मलिक जफर इक्बाल, याह्या मुजाबिद, नसरुल्ला, समीउल्ला आणि उमर बहादूर यांच्या नावांचा समावेश होता. याशिवाय हाफिज सईदचा नातेवाईक हाफिज अब्दुल रहमान मक्की याला ६ महिन्यांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले होते.

पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने एफआयआर दाखल केल्यानंतर मक्कीविरोधात ही कारवाई करण्यात आली होती. ट्रायल कोर्टाने या नेत्यांवर दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आढळला. दहशतवादाच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशातून बनवलेली मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. असे असतानां मात्र मुख्य न्यायमूर्ती मुहम्मद अमीर भाटी आणि न्या. तारिक सलीम शेख यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हाफिज सईदसह सहा नेत्यांविरुद्ध लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दिलेला निकाल रद्द केला. या सर्वांविधोरात आरोप सिद्ध करण्यात तक्रारकर्ते अपयशी ठरले, त्यामुळे शिक्षा रद्द करत त्यांची निर्दोष मुक्तता केली, असे सांगितले जात आहे.

Pakistan acquits Mumbai attack mastermind Hafiz Saeed’s six aides in terror financing case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात