भारतीय सीमेरेषेवरील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच सर्जिकल स्ट्राईक करू : अमित शहा यांचा पाकिस्तानला इशारा

विशेष प्रतिनिधी 

गोवा : काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांच्या हत्येमध्ये वाढ झाली आहे. मागील 20 दिवसांमध्ये दोन वेळा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. काश्मीरमधील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करण्याचे थांबवले नाही तर सर्जिकल  स्ट्राइक करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला आहे.

… Or else there will be surgical strike : amit shah warns pakistan

यापूर्वीही भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. यावरून हे सिद्ध होते की, आम्ही सामान्य नागरीकांवर झालेला कोणताही हल्ला आता खपवून घेणार नाही. त्यामुळे सीमेवर शास्त्रां सहित उल्लंघन केले किंवा काश्मीरमधील  भारतीय नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही निश्चितच सर्जिकल स्ट्राईक करू, असा इशारा अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला आहे. गोव्यामधील धारबांदोडा येथील राष्ट्रीय ज्ञान वैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात बोलताना अमित शहा यांनी हा इशारा पाकिस्तानला दिला आहे.


अरविंद केजरीवाल म्हणतात, कधीही फोन केला तर पंतप्रधान मोदी मदतीसाठी तयार असतात


पुढे बोलताना ते असेदेखील म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये असलेल्या प्रश्नांवर चर्चेची एकवेळ होती. पण ती वेळ निघून गेली आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. असेही अमित शहा यावेळी म्हणाले आहेत.

मागे भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्यावेळी पाकिस्तानने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, भारतीय विमानांनी मोकळ्या मैदानामध्ये बॉम्ब टाकले आणि निघून गेले. अशी कुत्सित प्रतिक्रीया पाकिस्तानने दिली हाेती. पण आता अमित शहा यांनी सांगितले आहे की, भारतीय सीमेरेषेवरील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच सर्जिकल स्ट्राइक करण्यात येईल.

… Or else there will be surgical strike : amit shah warns pakistan

 

महत्त्वाच्या बातम्या