वृत्तसंस्था
कोलकाता : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचा राजकीय मूड भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनगड यांच्या बाजूने नाही. ममतांनी आगामी संसद अधिवेशन आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची 21 जुलै रोजी बैठक बोलावली आहे. त्या दिवशी संध्याकाळी ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. Opposition splits over vice presidential candidature of jagdeep Shankar by BJP and NDA
असे असले तरी जगदीप धनगड यांच्या उमेदवारीमुळे विरोधी पक्षांमध्येच फूट पडायला सुरुवात झाली आहे. जे द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारी बाबत झाले तेच जगदीप धनगड यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी बाबत होत आहे. द्रौपदी मुर्मू यांना आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष वायएसआर काँग्रेसने पाठिंबा दिला आहे, तसाच आता जगदीप धनकर यांनाही दिला आहे. जगदीश धनगड यांचे अभिनंदन. ते उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी उत्तम रित्या निभावतील, असे ट्विट वायएसआर काँग्रेसचे खासदार विजय साई रेड्डी यांनी केले आहे.
जगदीश धनगड हे राजस्थानातले आहेत. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे काँग्रेस सरकार आणि काँग्रेसचे आमदार नेमके काय करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान असते. त्यात पक्षीय व्हीप लागू नसतो. या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्ये फूट पडायला सुरुवात झाली आहे.
YSR कांग्रेस पार्टी के सांसद विजयसाई रेड्डी ने जगदीप धनखड़ को NDA द्वारा उपराष्ट्रपति पद के उम्मीदवार के रूप में नामित किए जाने पर बधाई दी। pic.twitter.com/Hh0mW4OQ4A — ANI_HindiNews (@AHindinews) July 17, 2022
YSR कांग्रेस पार्टी के सांसद विजयसाई रेड्डी ने जगदीप धनखड़ को NDA द्वारा उपराष्ट्रपति पद के उम्मीदवार के रूप में नामित किए जाने पर बधाई दी। pic.twitter.com/Hh0mW4OQ4A
— ANI_HindiNews (@AHindinews) July 17, 2022
ममतांचा पाठिंबा नाही
सर्वसाधारणपणे ज्या राज्याच्या राज्यपालांना वरिष्ठ पदावर नेमणुकीची अथवा निवडण्याची संधी येते, त्यावेळी संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री त्यांना पाठिंबा देतात. अर्थात अशी प्रथा आहे. तसा नियम नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि जगदीश धनगड यांचे राजकीय अहि नकुलाचे नाते लक्षात घेता त्या जगदीप धनगड यांना पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. जगदीप धनगड हे सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. जगदीप धनगड आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात वारंवार मतभेद झाले आहेत.
– ममतांचा भाजपवर निशाणा
ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधला होता. द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यापूर्वी भाजपने विरोधी पक्षांशी बोलून त्यांच्याशी सल्लामसलत केली असती, तर त्यासर्वानुमते उमेदवार असू शकल्या असत्या, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App