राष्ट्रपती पदाची उमेदवारी मागे घेण्याचे यशवंत सिन्हा यांना प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर करणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या चांगलेच राजकीय पथ्यावर पडले आहे. कारण द्रौपदी मुरमुरे यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती देणे भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी राजकीय दृष्ट्या सर्वाधिक अनुकूल बाब ठरली आहे. Prakash Ambedkar appeals to Yashwant Sinha to withdraw his presidential candidature

काँग्रेस सह सर्व विरोधी पक्ष राजकीय दृष्ट्या खिंडीत गाठले गेले आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आमदार, खासदार आता आपले पक्ष भेद बाजूला ठेवून द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यासाठी पुढे येत आहेत. नेमकी हीच बाब वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हेरली आहे आणि त्यांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचे आवाहन केले आहे.


राजकीय जमवाजमव “ऑफर” : प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंना; तर रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना!!


भाजपने द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी देशातल्या “नाही रे” वर्गाची उमेदवारी आहे, तरी यशवंत सिन्हा हे “आहे रे” वर्गाचे प्रतिनिधित्व करतात, अशा पद्धतीने राजकीय मांडणी केली आहे. द्रौपदी मुर्मू यांना आत्तापर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, बिजू जनता दल, ईशान्य कडच्या राज्यातील प्रादेशिक पक्ष आदी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचे पारडे निश्चित जड आहे. परंतु द्रौपदी मुर्मू यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यासाठी त्या स्वतः विविध राज्यांचा दौरा करत आहेत. या पार्श्वभूमीवरच प्रकाश आंबेडकरांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

Prakash Ambedkar appeals to Yashwant Sinha to withdraw his presidential candidature

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात