महाराष्ट्रात “मनातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये” आणखी एकाची भर!!


महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावर असले तरी अनेकांच्या मनात अनेक मुख्यमंत्री दडलेले आहेत. काही लोकांनी आपल्या “मनातले मुख्यमंत्री” बोलूनही दाखवले आहेत. काही लोकांनी अद्याप स्वतःहून बोलून दाखवले नसले तरी मराठी माध्यमांकरवी ते बोलून दाखवले आहेत!! Race for chief ministership of maharashtra intensifies as vinayak mete says devendra fadnavis is is chief minister of our minds

मेटेंच्या मनात फडणवीस मुख्यमंत्री

पण आज मात्र शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे हे आपल्या सत्कार समारंभात आपल्या “मनातले मुख्यमंत्री” कोण?? हे बोलून मोकळे झाले. महाराष्ट्रात जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर असले आणि त्यांच्याबद्दल आपल्याला आदर असला तरी आमच्या मनात मात्र तुम्हीच मुख्यमंत्री आहात!!, असे ते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आता त्यावरून जोरदार खल सुरू झाला आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून कलगीतुरा लावण्याचा प्रयत्न मराठी माध्यमे आधीच करत आहेत. कोण कोणाचा माईक खेचतो, कोण कोणाला चिठ्ठी लिहितो, कोणाच्या शेजारी कोणी खुर्ची सरकवली, वगैरे बातम्या मराठी माध्यमे देत आहेत. असे असतानाच विनायक मेटेंनी देवेंद्र फडणवीस यांना “मनातले मुख्यमंत्री” असे संबोधून नवा राजकीय फटाका लावला आहे.

पंकजा मुंडे मनातल्या मुख्यमंत्री

पण विनायक मेटे हे “मनातले मुख्यमंत्री” बोलून दाखवणारे एकमेव नेते नाहीत. याची सुरुवात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी 2014 ते 2019 या कालावधीत केली होती. देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आपणच “जनतेच्या मनातल्या” मुख्यमंत्री आहोत असे वक्तव्य त्यांनी केले होते. किंबहुना मनातल्या मुख्यमंत्रीपदाच्या संकल्पनेचा उदयच त्यांच्या करवी झाला आहे. सध्या सुरू आहे तो त्या संकल्पनेचा विस्तार आहे.

उद्धवजींच्या मनात शिंदे मुख्यमंत्री

त्यानंतर अनेकदा अनेकजण अनेकांच्या “मनातले मुख्यमंत्री” झाले. मध्यंतरी ठाकरे – पवार सरकार डळमळीत असताना एबीपी माझाच्या कट्ट्यावर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हेच उद्धव ठाकरे यांच्या “मनातले मुख्यमंत्री” होते, असे बोलून दाखवले होते. शिंदे यांचे बंड तेव्हा शिजत होते. ते यशस्वी व्हायचे होते. पण तेवढ्यात एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या “मनातले मुख्यमंत्री” ठरवून संजय राऊत यांनी गुगली टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या गुगली वर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली नाही… विकेट गेली ती उद्धव ठाकरे यांची!!

पवारांच्या मनात सुप्रिया मुख्यमंत्री

पण या खेरीजही महाराष्ट्रात आणखी एक “मनातल्या मुख्यमंत्री” आहेत. मराठी माध्यमांच्या बातम्यांवर आणि विश्लेषणावर विश्वास ठेवला, तर शरद पवारांच्या मनात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या “मनातल्या मुख्यमंत्री” ठरतात.

मुख्यमंत्री पदाची रेस तीव्र

बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनातले मुख्यमंत्री अडीच वर्षात घरी गेले. देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाची एक टर्म पूर्ण झाली आहे. आता दुसरी उपमुख्यमंत्रीपदाची टर्म सुरू झाली आहे. पण मराठी माध्यमांनी ठरवल्यानुसार शरद पवारांच्या “मनातल्या मुख्यमंत्री” मात्र अजून व्हायच्या शिल्लक आहेत. तेवढ्यातच आता एकेकाळी पवारांच्या जवळचे मानले जाणारे नेते विनायक मेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांना “आपल्या मनातले मुख्यमंत्री” ठरवून मनातल्या मुख्यमंत्रीपदाची रेस आणखी तीव्र करून ठेवली आहे!!

Race for chief ministership of maharashtra intensifies as vinayak mete says devendra fadnavis is is chief minister of our minds

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात