राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्यावर विरोधक अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संसदेत गोंधळ घालून गेले दोन आठवडे गोंधळ घालून अधिवेशनाचा बहुमूल्य वेळ विरोधकांनी पाण्यात घालविला. आता पुढील आठवड्यातील गोंधळाची तयारी सुरू आहे. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे.Opposition groups called for a no-confidence motion against Rajya Sabha Speaker Venkaiah Naidu

उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे उपसभापती असतात. त्यामुळे तांत्रिक दृष्टया त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला तरी त्याला कायदेशिर अधिकार नाही. मात्र, तरीही राज्यसभेत गोंधळ घालण्यासाठी विरोधकांनी त्याची तयारी सुरू आहे.गेल्या दोन आठवड्यता विरोधकांनी पेगासिस हेरगिरी, नवी कृषि कायदे आणि इतर मुद्यांवरून संसदेत गोंधळ घातला. त्यामुळे संसद चालू शकली नाही. भारतीय करदात्यांचे १३३ कोटी रुपये त्यामुळे पाण्यात गेले.

या मुद्यांवर फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत असल्याने आता तृणमूल कॉँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, कॉँग्रेस आणि इतरांनी नायडू यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे ठरविले आहे. पावसाळी अधिवेशनात पेगासिस स्पायवेअर, कोरोना लसीकरण आणि इतर मुद्यांवर सरकारने निवेदन करावे अशी मागणी केली आहे. परंतु, त्याकडे सरकार लक्ष देत नाही असा आरोप विरोधक करत आहेत.

तृणमूल कॉँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी केंद्र सरकारच संसद चालवू देत नाही, असा आरोप केला आहे. विरोधी पक्षाला ते कितीवेळा बैठकीस बोलावतात हे महत्वाचे नाही तर संसदेत काय चर्चा होते हे महत्वाचे आहे.विरोधकच संसद चालवू देत नाहीत. गोंधळ घालत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

तृणमूल, द्रुमुक आणि कॉँग्रेस यांनी अविश्वस ठराव आणण्याची तयारी केली असली तरी इतर पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला नाही. बिजू जनता दल, वायएसआर कॉँग्रेस, तेलंगणा पार्टी यांनी विरोधकांच्या गोंधळापासून दूर राहणेच पसंत केले आहे. त्यामुळे विरोधकांचा अविश्वास हा केवळ गोंधळ घालण्याचा एक बहाणा ठरणार आहे.

Opposition groups called for a no-confidence motion against Rajya Sabha Speaker Venkaiah Naidu

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण