भारत होणार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष, एम महिन्यासाठी मिळाला मान


विशेष प्रतिनिधी

जिनिव्हा : जागतिक राजकारणात अत्यंत महत्वाची असल्लेल्या १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद भारत १ ऑगस्टपासून स्वीकारणार आहे. या महिन्यात सागरी सुरक्षा, शांतता आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन महत्त्वाच्या विषयांवरील कार्यक्रम आयोजित करण्याच्या तयारीत आहे.India to host UN Security Council

आम्ही देशाचा ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असलेल्या महिन्यातच शक्तिशाली अशा सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवायला मिळणे हा आमच्यासाठी बहुमान आहे, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायम प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी अध्यक्षपद स्वीकारण्याच्या पूर्वसंध्येला व्हिडीओ संदेशात सांगितले.



भारताच्या अध्यक्षपदाचा कामकाजाचा पहिला दिवस सोमवार, २ ऑगस्ट राहणार असून, तिरुमूर्ती हे त्या दिवशी संयुक्त राष्ट्रे मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२१ ला सुरू झाला होता.

अस्थायी सदस्य म्हणून २०२१-२२ या कालावधीत ऑगस्ट महिन्यात मिळणारे भारताचे पहिले अध्यक्षपद असणार आहे. पुढील वर्षीच्या डिसेंबरमध्ये पुन्हा भारताकडे हे अध्यक्षपद येणार आहे.

India to host UN Security Council

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात