भाजपाचे सरचिटणिस बी. एल. संतोष यांनी माध्यमांच्या डोळ्यात घातले अंजन, ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून कोणीही प्रश्न का विचारला नाही?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली भेटीवरून राजकारण तापविणाऱ्या माध्यमांनी त्यांना निवडणुकींनतरच्या हिंसाचाराबाबत का विचारले नाही असा सवाल विचारत भारतीय जनता पक्षाचे सरचिटणिस बी. एल. संतोष यांनी माध्यमांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.BJP general secretary B. L. Santosh slams media. Why no one has asked Mamata Banerjee about the violence in West Bengal?

बी. एल. संतोष यांनी ट्वीट करून प्रसारमाध्यमे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एक मुख्यमंत्री दिल्लीला येतात. इथे काही राजकीय गाठीभेटी केल्यानंतर त्या त्यांच्या राज्यात निघून जातात. दिलेल्या सहकायार्साठी माध्यमांचे आभार देखील मानतात.



पण एकाही स्वयंघोषित अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते असणाºयाने त्यांना त्यांच्या राज्यात होत असलेला राजकीय हिंसाचार आणि क्रूर हत्यांविषयी प्रश्न विचारला नाही.पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या.

यामध्ये ममता बॅनर्जी यांनी आपलं नेतृत्व पुन्हा सिद्ध करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, या निवडणुकी दरम्यान कूचबिहार आणि इतर काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे मतदान प्रक्रियेला बोट लागलं. त्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही घटना घडल्याचं समोर आले.

गेल्याच आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत येऊन भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या काही नेत्यांचीही भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही त्या भेटल्या.

या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या विरोधात विरोधकांची मोटच बांधण्याचा जणू इशारा दिला. त्यांच्या या भेटीनंतर भाजपाकडून परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांनी ममता बॅनर्जींवर आणि प्रसारमाध्यमांवर टीकास्त्र सोडलं आहे.

BJP general secretary B. L. Santosh slams media. Why no one has asked Mamata Banerjee about the violence in West Bengal?

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात