पाकव्याप्त काश्मीरमधील तथाकथित निवडणुकांवरून इम्रान खान अडचणीत


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद – भारताने रद्दबातल ठरविलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील तथाकथित निवडणुकांवरून आता पाकिस्तानमध्ये राजकारण झडू लागले आहे. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाने गैरमार्गाने विजय मिळवल्याचा आरोप विरोधकांनी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या अडचणीँत वाढ होणार आहे. Opposition parties targets Imran Khan

पाकव्याप्त काश्मीरमध्ये नुकत्याच घेतलेल्या निवडणुकांबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध निदर्शने करण्याची घोषणा पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ या मुख्य विरोधी पक्षाने घेतली आहे. या निवडणुकीत गैरप्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.या निवडणुकीत इम्रान यांच्या पक्षाने सर्वाधिक २५ जागा जिंकत बहुमत संपादन केले. पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ११ जागा मिळाल्या. पीएमएल-एन पक्षाला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापटी झडल्या होत्या.

पक्षाचे सरचिटणीस एहसान इक्बाल यांनी सांगितले की, आमच्या पक्षाचे उमेदवार पाकव्याप्त काश्मीरमधील आपापल्या मतदारसंघांमध्ये निदर्शने करतील. पहिल्या टप्प्यातील या कृतीनंतर पक्ष पुढील रणनीती ठरवेल. या निवडणुकीच्या तसेच सियालकोटमधील पोटनिवडणुकीच्या निकालांवरून इम्रान यांचे सरकार जनतेचे खरेखुरे प्रतिनिधित्व करीत नसल्याचे सिद्ध होते. हे सरकार जबरदस्तीने तसेच गैरप्रकारांच्या मार्गाने जनतेवर लादण्यात आले आहे.

Opposition parties targets Imran Khan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था