सौरउर्जा महागडी , पण आता सौरउर्जा साठवणे शक्य


उर्जेवरच साऱ्या वेगवान जगाचा डोलारा खऱ्या अर्थाने उभा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या इंधनावरच उर्जेची खरी गरज भागविली जाते. मात्र पेट्रोल-डिझेलचे साठे मर्यादित होत चालले आहेत. जगभरात या इंधनाचा वापर वाढल्याने ते लवकरच संपण्याच्या मार्गावर असून पर्यायी इंधनाचा शोध सुरू झाला आहे. त्यात सौरऊर्जा ही महत्वाची मानली जाते. युरोप व अमेरिकेने अनेक शोध लावले आहेत. मात्र तेथे सौरउर्जेची कमतरता असल्याने या क्षेत्रात फारशी प्रगती झाली नसल्याचे मानले जाते.Solar energy is expensive, but now it is possible to store solar energy

त्यामुळे सौरउर्जा महागडी आहे. तसेच ती साठवून ठेवण्याचा मोठा प्रश्न आहे. मात्र सध्या सौरऊर्जेचे रूपांतर हायड्रोजन इंधनात करून ते दिवसा साठवून त्याचा वापर रात्री करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. सौरऊर्जा ही स्वच्छ ऊर्जा आहे. तेल, कोळशापेक्षा ती अधिक चांगली आहे. मात्र दिवसा सूर्याची किरणे तीव्र असल्यास त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. अमेरिकेतील कॅरोलिना विद्यापीठात सौरऊर्जेवर संशोधन सुरू आहे.

यात विशेष म्हणजे सौरऊर्जेचे रूपांतर थेट विजेत न करता ते हायड्रोजन इंधनात केले जाते. त्यानंतर ते कधीही वापरता येते. त्यामुळे ते हवे तेव्हा अगदी रात्रीही वापरता येऊ शकते. सौरऊर्जा जगाच्या विविध भागात मिळत असली तरीही ती साठवून ठेवणे अत्यंत कठीण काम आहे. या संशोधनातून ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. याचे नाव डाय-सेनसिसेड फोटो इलेक्ट्रोलिसीस सेल असे ठेवण्यात आले आहे. या प्रकारात सौरऊर्जेच्या वापराने पाण्यातील आक्सिजन व हायड्रोजनचे विभाजन करून हायड्रोजन इंधन तयार केले जाते. त्यानंतर आक्सिजन हवेत सोडला जातो.

पाण्यातील दोन अणूंपासून चार इलेक्ट्रॉनचे विभाजन करणे गरजेचे असते. त्यानंतर त्यांचे रूपांतर हायड्रोजनमध्ये केले जाते. सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर पाण्यातील अणू तातडीने वेगळे होतात. त्यानंतर हायड्रोजन इंधन तयार होते. नॅनो पार्टिकलचा वापर केल्यास इलेक्ट्रॉन निर्मितीची प्रक्रिया वेगाने होते.

Solar energy is expensive, but now it is possible to store solar energy

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात