
One Lakh Jawans To Be Reduced From Indian Army : भारतीय लष्कराचे स्वरूप बदलण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सैन्याची लॉजिस्टिक टेल लहान करण्याची तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत सैन्याच्या तुकडीसमवेत सप्लाय व सपोर्ट देणाऱ्या जवानांची संख्या कमी केली जाणार आहे. सैन्याने आगामी तीन ते चार वर्षांत तब्बल एक लाख सैनिक कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. One Lakh Jawans To Be Reduced From Indian Army in Next 3 to 4 years Reports
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे स्वरूप बदलण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सैन्याची लॉजिस्टिक टेल लहान करण्याची तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत सैन्याच्या तुकडीसमवेत सप्लाय व सपोर्ट देणाऱ्या जवानांची संख्या कमी केली जाणार आहे. सैन्याने आगामी तीन ते चार वर्षांत तब्बल एक लाख सैनिक कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
टूथ टू टेल रेशो
सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच संरक्षण मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीला ही माहिती दिली आहे. असे म्हटले की, लढाऊ सैन्यावर (पायदळ) लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ते आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असतील. कारण सीमांच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविले जाईल आणि ‘टूथ टू टेल रेशो’ कमी केला जाईल.
याचा अर्थ असा की पुरवठा आणि साहाय्य करण्याच्या कामात गुंतलेल्या सैनिकांची संख्या कमी होईल. वास्तविक, सैन्याच्या लढाऊ सैनिकांसह एका निश्चित संख्येत सप्लाय व सपोर्टची टीम असते. ही टीम सर्व संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करते. परंतु सैन्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्या पद्धतीने वाढत आहे, त्यावरून आता या प्रकारची यंत्रणा अत्यावश्यक राहणार नाही.
80 जण करू शकतात 120 जणांचे काम
संसदीय समितीला एका उदाहरणाद्वारे समजावून सांगण्यात आले की, सैन्याच्या लढाऊ तुकडीत सध्या 120 जण आहेत. परंतु ही तुकडी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असेल तर तेच काम 80 जण करू शकतात.
याच पैशांतून सैनिकांना तंत्रज्ञानाने सुसज्ज करता येईल
सैन्याच्या वतीने असे म्हटले गेले की जनरल व्ही.पी. मलिक लष्करप्रमुख असताना तेथे 50 हजार जणांची कपात करण्यात आली होती, परंतु आता पुढच्या तीन-चार वर्षांत एक लाख जवान कमी होऊ शकतात. यातून जो पैसा वाचेल त्याद्वारे जवानांना तंत्रज्ञानाने सुसज्ज करता जाईल. समितीचा हा अहवाल नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात संसदेत मांडण्यात आला आहे.
One Lakh Jawans To Be Reduced From Indian Army in Next 3 to 4 years Reports
महत्त्वाच्या बातम्या
- संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर भारत, आता खासगी कंपन्याही करणार मिसाईलची निर्मिती, DRDOने दिली मंजुरी
- डेबिट कार्ड घरीच विसरलात? काळजी करू नका, फक्त मोबाइलच्या मदतीने एटीएममधून असे काढा पैसे
- उध्दव ठाकरेंची परिस्थिती पाहून वाटतेय, की त्यांच्या हातात “राज्य दिलंय” की त्यांच्यावर “राज्य आलंय”? राज ठाकरेंची खोचक टिपण्णी
- कोण आहेत डॉ. जयश्री पाटील? ज्यांच्या याचिकेमुळे गेली अनिल देशमुखांची विकेट, जाणून घ्या…!
- म्यानमारची धाकड ब्युटी क्वीन बनली लष्करशाहीच्या विरोधाचे प्रतीक, आंतरराष्ट्रीय पातळीवर उठवला आवाज