म्यानमारची धाकड ब्युटी क्वीन बनली लष्करशाहीच्या विरोधाचे प्रतीक, आंतरराष्ट्रीय पातळीवर उठवला आवाज

Myanmar's beauty queen Han Lay becomes symbol of Protest to army coup

Myanmar’s beauty queen Han Lay : म्यानमारची ब्युटी क्वीन हान ले सध्या चर्चेत आली आहे. सौंदर्य स्पर्धा गाजवणारी ही ब्यूटी क्वीन आता म्यानमारच्या लष्करशाहीविरोधातील आंतरराष्ट्रीय चेहरा बनली आहे. गत आठवड्यात म्यानमारमधील सैन्याच्या कथित अत्याचारांबद्दल मिस ग्रँड म्यानमार हान ले हिच्या भाषणाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. Myanmar’s beauty queen Han Lay becomes symbol of Protest to army coup


वृत्तसंस्था

बँकॉक : म्यानमारची ब्युटी क्वीन हान ले सध्या चर्चेत आली आहे. सौंदर्य स्पर्धा गाजवणारी ही ब्यूटी क्वीन आता म्यानमारच्या लष्करशाहीविरोधातील आंतरराष्ट्रीय चेहरा बनली आहे. गत आठवड्यात म्यानमारमधील सैन्याच्या कथित अत्याचारांबद्दल मिस ग्रँड म्यानमार हान ले हिच्या भाषणाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

थायलंडमधील मिस ग्रँड आंतरराष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान म्यानमारच्या दु:खाबद्दल बोलताना हान ले म्हणाली की, “म्यानमारमध्ये अनेक जण मारले गेले आहेत. म्यानमारला आता आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीची गरज आहे. प्लीज मदत करा.” हान ले अवघी 22 वर्षांची आहे. मिस ग्रँड इंटरनॅशनलमध्ये सहभाग घेण्यापूर्वी काही दिवसआधी तिने लष्करशाहीचा निषेध करण्यासाठी म्यानमारमधील यंगून शहरातील रस्त्यावर उतरून संघर्षही केला.

लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकारविरुद्ध लष्काराचे बंड

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आंग सान स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसीने म्यानमारमधील 83 टक्के जागा जिंकल्या. परंतु म्यानमारच्या सेनेने सत्ता उलथवून ती ताब्यात घेतली. लष्कराने आंग सान स्यू की यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली. त्यानंतर म्यानमारमध्ये सैन्याविरोधात जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. या आंदोलनात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे.

कुटुंबाच्या सुरक्षेमुळे हान ले काळजीत

म्यानमारमधील परिस्थिती लक्षात घेता हान ले हिने ठरवले की, ती आपल्या देशाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणार. हान ले हिने सांगितले की, तिच्या देशात पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. तिला पूर्ण कल्पना आहे की, सैन्याविरुद्ध असं जगजाहीर बोलणे किती धोकादायक ठरू शकते. म्यानमारमधील तिच्या हितचिंतकांनी तिला देशात न येण्याचा सल्ला दिला आहे. अशा स्थितीत हान ले सध्या थायलंडमध्येच राहतेय. तिला आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची चिंताही सतावत आहे.

सोशल मीडियावर पाठिंबा आणि धमक्याही

म्यानमारमध्ये सैन्याने गेल्या काही दिवसांत बर्‍याच पत्रकारांना, कार्यकर्त्यांना आणि सेलिब्रिटींनाही अटक केली आहे. हान ले हिलाही सोशल मीडियावर सातत्याने धमक्या मिळत आहेत. तथापि, तिच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांचीही कमतरता नाही. यामुळेच 22 वर्षांची ही तरुणी म्यानमारच्या सैन्य उठावाचा आणि हिंसाचाराचा विरोध करणारा मुख्य चेहरा म्हणून उदयास आली आहे.

Myanmar’s beauty queen Han Lay becomes symbol of Protest to army coup

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात