‘ जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे ‘ : कंगना रनौतचे ‘ ट्विटास्त्र ‘

  • ‘यह तो सिर्फ़ शुरुआत है…’ ! अनिल देशमुखांचा राजीनामा कंगनाचे ट्विट

  • कंगना रनौत सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे आपली मतं मांडत असते. 2020मध्ये पालघर साधू मॉब लिचींग प्रकरणानंतर कंगनाने उघडपणे महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले होते. Actress kangana Ranaut slams mahavikas Aaghadi Government after Anil Deshmukhs resignation

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने महाविकास आघाडी सरकारवर ट्विटास्त्र सोडले आहे.

कंगना रनौत सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे आपली मतं मांडत असते. 2020मध्ये पालघर साधू मॉब लिचींग प्रकरणानंतर कंगनाने उघडपणे महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अगदी असेही म्हटले होते की, कंगनाला येथे राहण्याचा काहीही अधिकार नाही. आता राजीनामा दिल्यानंतर यावरूनच कंगनाने अनिल देशमुख यांना लक्ष्य केले आहे.कंगनाच्या एका चाहत्याने सप्टेंबर 2020मधील कंगनाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील घराची तोडफोड केली होती. यानंतर कंगनाने व्हिडीओद्वारे महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर टीका केली होती.

आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा टॅग करत लिहिले की, ‘साधूंची हत्या करुन महिलेचा अपमान करणार्‍यांची पडझड निश्चित आहे.’ हा व्हिडीओ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कंगनाने स्वतःदेखील हा व्हिडीओ ट्विट करत, ‘जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे बघा आणखी कायकाय होते..’ असे म्हटले आहे. यावर नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.

Actress kangana Ranaut slams mahavikas Aaghadi Government after Anil Deshmukhs resignation

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*