कोण आहेत डॉ. जयश्री पाटील? ज्यांच्या याचिकेमुळे गेली अनिल देशमुखांची विकेट, जाणून घ्या…!

Know Who is Adv Jayashree Patil, Lawyer Who Filed petition Against Anil Deshmukh in HC

Who is Adv Jayashree Patil : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी नुकताच गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर वाझेंच्या मदतीने 100 कोटींच्या खंडणीखोरीचे गंभीर आरोप केले होते. यानंतर अवघ्या देशात खळबळ उडाली. परमबीर यांच्या आरोपांनंतर अॅड. जयश्री पाटील यांनी देशमुखांविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्याच याचिकेवर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआय चौकशीचे आदेश दिले. परिणामी, अनिल देशमुख यांनी नैतिकतेचे कारण देऊन गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो वा नुकतेच राज्यात घडलेले 100 कोटींच्या खंडणीखोरीचे प्रकरण, यामुळे अॅड. जयश्री पाटील कायम चर्चेत राहिल्या आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. Know Who is Adv Jayashree Patil, Lawyer Who Filed petition Against Anil Deshmukh in HC


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी नुकताच गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर वाझेंच्या मदतीने 100 कोटींच्या खंडणीखोरीचे गंभीर आरोप केले होते. यानंतर अवघ्या देशात खळबळ उडाली. परमबीर यांच्या आरोपांनंतर अॅड. जयश्री पाटील यांनी देशमुखांविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्याच याचिकेवर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआय चौकशीचे आदेश दिले. परिणामी, अनिल देशमुख यांनी नैतिकतेचे कारण देऊन गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो वा नुकतेच राज्यात घडलेले 100 कोटींच्या खंडणीखोरीचे प्रकरण, यामुळे अॅड. जयश्री पाटील कायम चर्चेत राहिल्या आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे.

कोण आहेत अॅड. जयश्री पाटील?

अॅड. जयश्री पाटील या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. एल. के. पाटील यांच्या कन्या आहेत. सुप्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्या त्या पत्नी आहेत. उच्चविद्याविभूषित जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून तब्बल 7 वर्षे काम केलं आहे. मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या वकील म्हणून त्या सुप्रसिद्ध आहेत. मानवाधिकारावर त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Know Who is Adv Jayashree Patil, Lawyer Who Filed petition Against Anil Deshmukh in HC

अॅड. जयश्री पाटील या प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत.

मराठा आरक्षणाला विरोध

उल्लेखनीय बाब म्हणजे, जयश्री पाटील यांनी कायद्यात पीएचडी केलेली आहे. त्यांचे वडील इंडियन कॉन्स्टिट्यूशनॅलिस्ट कौन्सिलचे सदस्य आहेत. मागच्या 22 वर्षांपासून जयश्री या वकिली व्यवसायात आहेत. मराठा आरक्षणाला अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयातही विरोध केला होता. हायकोर्टाकडून मंजूर झाल्यानंतर अॅड. जयश्री पाटील यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.

जयश्री पाटील यांनी देशमुखांवर डागले टीकास्त्र

उच्च न्यायालयाच्या सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली. यावेळी त्या माध्यमांसमोर म्हणाल्या की, तुम्ही कितीही मोठे मराठा नेते असाल किंवा शरद पवारांचा तुमच्यावर वरदहस्त असेल, पण कायदा आणि संविधानापेक्षा तुम्ही मोठे नाहीत. राज्यात मोगलाई नाही, त्यामुळं तुम्ही कोणाला धमक्या देऊ शकत नसल्याचं म्हणत न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, काही मराठा संघटनांनी जयश्री पाटील यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून यातून मराठा समाजाची नाहक बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

Know Who is Adv Jayashree Patil, Lawyer Who Filed petition Against Anil Deshmukh in HC

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात