ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा कारखाना महिलाच चालविणार; दहा हजार महिला कर्मचारी नेमणार ; मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल


वृत्तसंस्था

चेन्नई : इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीत जगातील सर्वात मोठी कंपनी बनणाऱ्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या कारखान्यात तब्बल दहा हजार महिला कर्मचारी काम करणार आहेत. तामिळनाडूत हा कारखाना उभारला आहे. लवकरच तो पूर्ण क्षमतेने चालविला जाणार आहे.Ola electric scooter facility to be largest all-women factory in the world

तामिळनाडूत इलेक्ट्रिक स्कुटर निर्मितीचा ओलाचा सर्वात मोठा कारखाना आहे. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी सोमवारी ही माहिती दिली. विशेष म्हणजे हा कारखाना महिलाच चालविणार आहेत.



ओला इलेक्ट्रिक एस 1 आणि एस 1 प्रो स्कुटर ही दोन मॉडेल तयार करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील कारखान्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. वर्षात २ कोटी स्कुटर निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. देशाबरोबर परदेशात स्कुटरची निर्यात केली जाणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतही पुढील वर्षी निर्यात होणार आहे.

भाविश अग्रवाल यांनी ट्विटर आणि ब्लॉगवर याबाबत अधिक माहिती देताना लिहिले आहे की, कारखाना संपूर्णतः महिलाच चालविणार आहेत. आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर महिलांची गरज असल्याने दहा हजारांवर महिलांची नियुक्ती केली जाणार आहे. महिला चालवत असलेली जगातील हा सर्वात मोठा कारखाना असेल.

पुरुषांप्रमाणेच महिला काम करू शकतात . तसेच महिलांना मदत करण्याच्या उद्देशाने कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिलांना त्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या द्वारे त्या आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याबरोबर कुटुंबाचा चरिथार्थ देखील चालवू शकतील. पर्यायाने समाज बांधणीच्या आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग त्यांना मिळणार आहे.

ओला स्कुटरचा हा प्लांट ५०० एकर क्षेत्रावर वसला असून त्यासाठी कंपनीने तामिळनाडू सरकारबरोबर २ हजार ४०० कोटींचा करार केला आहे. भूसंपादन जानेवारीत झाले आहे. फेब्रुवारीत बांधकामास सुरु झाले. तसेच स्कुटर निर्मितीत ५ हजार रोबोटचा वापर केला जाणार आहे.

ओला एस 1 स्कुटर बाजारात आली असून तिची किंमत १ लाख रुपये आहे. ज्यांनी बुकिंग केले आहे त्यांना ऑक्टोम्बरपासून वितरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी वितरक नेमले नसून थेट होम डिलिव्हरी केली जाणार आहे.

Ola electric scooter facility to be largest all-women factory in the world

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात