पी. चिदंबरम यांना जेलची हवा खायला लावणारे अधिकारी उत्तर प्रदेशात भाजपचे उमेदवार


विशेष प्रतिनिधी

लखनऊ: माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जेलची हवा खायला लावणारे सक्तवसुली संचालनालयाचे संयुक्त संचालक राजेश्वर सिंह उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यांना सुलतानपूर येथे उमेदवारी देण्यात येणार आहे.Officer who arrested P. Chidaambaram is BJP candidate in Uttar Pradesh

राजेश्वर सिंह यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. याबाबत त्यांनीच माहिती दिली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप त्यांना सुलतानपूर येथून उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. राजेश्वर सिंह यांनी जे निवेदन जारी केले आहे त्यात भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.



राजेश्वर सिंह यांनी १० वर्षे उत्तर प्रदेश पोलीस दलात सेवा बजावली. गेली १४ वर्षे ईडीमध्ये विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ११ वर्षांचा सेवाकाळ बाकी असतानाच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतली आहे. त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जगत प्रकाश नड्डा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारताला जागतिक शक्ती आणि विश्वगुरू बनवण्याचा संकल्प केला आहे. त्या संकल्पासाठी योगदान द्यायचे आहे. जनसेवेच्या या मार्गावर येथून पुढे निरंतर चालायचे आहे, असे राजेश्वर सिंह यांनी म्हटले आहे.

सहाराप्रमुख सुब्रत रॉय यांच्यावर २४ हजार कोटींच्या हाउसिंग फायनान्स घोटाळ्याचा आरोप झाला. त्यात कारवाई करत राजेश्वर यांनी सुब्रत रॉय यांना जेलमध्ये टाकलं. एअरसेल-मॅक्सिस डील प्रकरणात देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर कारवाई करणारेही राजेश्वर सिंहच होते. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाण घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा,

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर डील अशा अनेक हायप्रोफाइल प्रकरणांत चौकशी पथकामध्ये राजेश्वर सिंह यांचा सहभाग होता. उत्तर प्रदेश पोलीस दलात असताना राजेश्वर सिंह हे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या नावावर १३ एन्काउंटर आहेत.

लखनऊमध्ये पोलीस उपअधीक्षक असताना गुन्हेगारीला त्यांनी मोठा लगाम लावला होता. २००९ मध्ये ते प्रतिनियुक्तीवर ईडीत गेले. २०१८ मध्ये त्यांना बेहिशेबी संपत्तीबाबत झालेल्या आरोपांमुळे चौकशीलाही सामोरे जावे लागले होते. मात्र, त्यात काहीही निष्पन्न झाले नव्हते.

Officer who arrested P. Chidaambaram is BJP candidate in Uttar Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात