विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमध्ये चरणजीत सिंग चन्नी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 96 तास उलटून गेले तरी दोन उपमुख्यमंत्र्यांशिवाय अख्ख्या मंत्रिमंडळाचा अद्याप पत्ताच नाही. एकट्या मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या बळावर पंजाबचे अख्खे प्रशासन सुरू आहे.No cabinet expansion yet in Punjab irks congress cadre
ज्या कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री पदावर बसवले, त्यांना नेमके काय अधिकार आहेत? मंत्रिमंडळ कधी बनवणार आहे? पंजाब प्रशासनाचा गाडा संपूर्ण मंत्रीमंडळ कधीपासून हाकणार आहे? हे प्रश्न खूप मोठे आहेत, पण त्यांची उत्तरे अद्याप “हवेतच” आहेत. ना मुख्यमंत्री उत्तरे देऊ शकत आहेत, ना काँग्रेस श्रेष्ठी!!
नवी दिल्लीत काल रात्री दहा ते पहाटे दोन वाजेपर्यंत मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी, उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यात बैठक झाल्याचे सांगण्यात येते. पाच तास चाललेल्या या बैठकीतून निष्कर्ष काय?, कोणालाच माहिती नाही.
कॅप्टन अमरिंदरसिंग हे मुख्यमंत्रिपदी असताना काँग्रेसमध्ये जेवढी अस्वस्थता होती, त्यापेक्षाही जास्त अस्वस्थता त्यांना बदलल्यानंतर वाढल्याचे यातून दिसते. एकीकडे कॅप्टन साहेबांनी काँग्रेस नेतृत्वावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. आपले मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर काँग्रेसला पंजाबमध्ये स्थिर राजवट मिळू द्यायची नाही हा चंग त्यांनी बांधला आहे. त्यालाच काँग्रेसचे नेते आपल्या कृतीतून जणू खत-पाणी घालत आहेत असे दिसते आहे.
सुप्रिया श्रीनेत यांच्यासारख्या प्रवक्त्यांना काँग्रेस नेत्यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर सोडून दिले आहे, पण त्यांच्या सारख्या नवोदित नेत्या कॅप्टन साहेबांसारख्या हेवीवेट नेत्याला कशा काय पुऱ्या पडू शकतील? कॅप्टन साहेबांनी आपल्या भात्यातले किरकोळच बाण आत्तापर्यंत बाहेर काढले आहेत. अजून मोठमोठी अस्त्रे ते बाहेर काढायचे आहेत. अशावेळी पंजाबचे “नसलेले” मंत्रिमंडळ आणि काँग्रेस श्रेष्ठी त्यांना कसे काय तोंड देऊ शकतील?, हाच खरा प्रश्न आहे.
दरम्यानच्या काळात राहुल गांधी यांनी आपली सिमला सफर उरकून घेतली आहे. त्याकाळात मंत्रिमंडळाच्या स्थापनेविषयी काहीच हालचाली झाल्या नसतील असे नाही पण निष्कर्ष मात्र निघाला नाही. याचा अर्थ असा कॅप्टन साहेबांना मुख्यमंत्री पदावरून हटवून काँग्रेसने समस्येवर तोडगा काढला नसून समस्येच्या गर्तेत स्वतःला आणखीनच लोटून घेतले आहे, हे मात्र नक्की…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App