देह व्यापारातून सुटका करीत लेखन करणाऱ्या नलिनी यांना प्रतिष्ठित राज्य चित्रपट पुरस्कार


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपुरम – देह व्यापारातून सुटका करीत लेखन क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या नलिनी जमिला (वय ६९) यांना केरळ सरकारचा प्रतिष्ठित राज्य चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.‘हा सन्मान मिळेल असे कदापिही वाटले नव्हते. मी प्रथमच एखाद्या चित्रपटासाठी वेशभूषाकार म्हणून काम केले.Nlini gets state film award

हा पुरस्कार म्हणजे माझ्या जीवनातील सर्वांत मोठी कामगिरी आहे, अशी भावना जमिला यांनी व्यक्त केला. ‘भरतपुझा’ या चित्रपटाची कथा त्रिचूरमधील सुगंधी या वेश्या व्यवसाय करणाऱ्या तिशीतील महिलेभोवती फिरते.



वेश्याल व्यवसाय करणाऱ्या जमिला यांनी सामाजिक परंपरा व मानसिकतेला झुगारून देत १५ वर्षांपूर्वी ‘द ऑटोबायग्राफी ऑफ ए सेक्स वर्कर’ नावाचे आत्मचरित्र लिहले आहे. त्यांच्या या पुस्तकाने पितृसत्ताक व्यवस्थेलाही मोठा धक्का देण्यात आला होता.

हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर ‘बेस्ट सेलिंग’ लेखिकेपासून कार्यकर्ती, लिंगसमानता तज्ज्ञापासून सामाजिक संबंधांबाबतच्या समुपदेशक अशा विविध रूपात त्यांची ओळख झाली. आता ‘भरतपुझा’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट वेशभूषाकाराचा पुरस्कार जाहीर करून केरळ सरकारने जमिला यांचा गौरव केला आहे.

Nlini  gets state film award

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात