सुरक्षा दलांकडून ओळख पटविण्याचा प्रयत्न नाही, नागालॅंड पोलिसांच्या अहवालातील धक्कादायक माहिती


विशेष प्रतिनिधी

कोहिमा : नागालॅंडमधील मोन जिल्ह्यात ट्रकमधून घरी परतत असलेल्या स्थानिक नागरिकांची ओळख पटविण्याचा कोणताही प्रयत्न सुरक्षा दलांकडून झाला नाही.’’ असा धक्कादायक दावा पोलिस महासंचालक टी जॉन लाँगकुमार आणि आयुक्त रोवीलातुओ मोर यांच्या संयुक्त अहवालामध्ये करण्यात आला आहे. Ngaland Police blames Army persons

दोन प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने तयार करण्यात आलेल्या या अहवालामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही धक्कादायक तपशील दिले आहेत. लष्कराच्या जवानांनी गोळीबार केल्यानंतर स्थानिकांचे मृतदेह पिकअप व्हॅनमध्ये भरून ते लपविण्याचा प्रयत्न केला. हे सगळे मृतदेह बेस कॅम्पवर नेण्याचा त्यांचा इरादा होता असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. लष्कराने केलेल्या गोळीबारामध्ये मरण पावलेले सगळे नागरिक हे निःशस्त्र होते. ते येथील कोळशाच्या खाणीत काम करत होते. या भागामध्ये गोळीबाराचे ऐकू येऊ लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लष्कराचे जवान हे कामगारांचे मृतदेह दुसऱ्या एका पिकअप व्हॅनमध्ये भरून बेस कॅंपवर नेण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.



रक्ताच्या थारोळ्यातील स्थानिकांचे मृतदेह पाहिल्यानंतर गावकऱ्यांचा एक गट बिथरला त्यानंतर त्याने थेट सुरक्षा दलांच्या वाहनांना आगी लावल्या. या जमावाला आवरण्यासाठी सुरक्षा दलांनी आणखी गोळीबार केला त्यामध्ये पुन्हा सातजण मरण पावले. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या जवानांनी आसामच्या दिशेने पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान या गोळीबारप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संसदेमध्ये दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.

Ngaland Police blames Army persons

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात