पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिल्वर ओकला भेट देऊन संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे राजकीय अस्तित्व शरद पवार यांच्या समोर पुसून पुरते ७२ तास उलटले नाहीत, तोच शरद पवार यांनी आपली भूमिका १८० अंशात फिरवली आहे.Sharad pawar to unite opposition parties including mamata against BJP, says nawab malik in delhi
दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला टक्कर देण्याची भाषा बोलण्यात आली आहे. याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली आहे. शरद पवार हे ममता बॅनर्जी यांना यूपीएशी जोडून घेतील, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
एकूण शरद पवार हे सर्व विरोधी पक्षांसाठी एक “सिमेंटिंग फोर्स” बनण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच नवाब मलिक यांनी केले आहे. “सिमेंटिंग फोर्स” हे शब्द स्वत: पवार हे काँग्रेसच्या गांधी परिवारासाठी वापरतात.
पण हे खरे आहे का?? याचा अर्थ शरद पवार यांची सिल्वर ओकमध्ये ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करताना भूमिका वेगळी होती आणि दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत भूमिका वेगळी घेण्यात आली असा घ्यायचा का?? मुंबईत ममता बॅनर्जी आणि पवार यांच्या भेटीच्या वेळी यांच्या भेटीनंतर देशामध्ये हे दोन नेते एकत्र विरुद्ध काँग्रेस असे जे राजकीय चित्र निर्माण झाले होते त्याला पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने छेद दिला आहे का? की नवाब मलिक म्हणतात त्याप्रमाणे पवार हे काँग्रेसप्रणीत यूपीए आणि ममता बॅनर्जी यांच्यातला राजकीय पूल बनू इच्छित आहेत?? की काँग्रेस आणि ममता या दोघांनाही ते हूल देऊ इच्छित आहेत?? की या दोघांच्या भांडणात लाभ असे म्हणत काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या भांडणात आपले स्वतःचेच नेतृत्व पुढे रेटत आहेत??, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
पवारांच्या गेल्या ५० वर्षांचा राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला, तर पवार नेमकी कधी, कुठे आणि कोणती भूमिका बदलतील?, याचा अंदाज अनेकांना येत नाही. तसाच अंदाज सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी पवार पुढाकार घेणार, या बाबतीत काँग्रेस आणि ममता बॅनर्जी या दोघांचाही पवार चुकवतील का?? की आणखी काही घडेल हे पाहणे रंजक ठरणार आहे…!!
दिल्लीचे राजकारण खेळताना पवारांचे नेहमी एका मराठी म्हणी सारखी गत झाली आहे, “घार उंच उडे, आकाशी तिचे लक्ष पिलापाशी!!”, ही ती मराठी म्हण आहे. पवार दिल्लीतले राजकारण जरूर खेळतात. पण त्यांचे सगळे लक्ष महाराष्ट्रावर केंद्रीत असते. आपला बालेकिल्ला जपण्यावर केंद्रित असते. मग दिल्लीत काय व्हायचे ते होवो, आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यावर त्यांचा भर असतो.
ममता बॅनर्जी यांच्या बरोबर जाऊन महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या टेकूवर उभ्या असलेल्या आपल्या बालेकिल्ल्यालाच तडा जातोय हे लक्षात आल्याने पाहून पवारांनी भूमिका बदलली आहे का?? यासाठीच त्यांनी नवाब मलिक यांच्या आधी संजय राऊत यांना कामाला लावून राहुल गांधी – प्रियांका गांधी यांच्या भेटीला पाठवले आहे का??, हेही पाहणे रंजक ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App