विशेष प्रतिनिधी
तिरवनंतपूरम : धर्मांध राजकारणासाठी चिमुकल्यांचा वापर करण्याचा धक्कादायक प्रकार केरळमध्ये घडला आहे. अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला १९ वर्ष पूर्ण झाल्याच्या घटनेची आठवण म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या खिशाला आय एम बाबरी असं लिहिलेले बॅज लावण्यात आले.The use of students for fanatical politics, badges written by I Am Babri were placed in the pockets of students
या प्रकरणी केरळ पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एक व्यक्ती सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अर्थात एसडीपीआयची सदस्य असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने देखील या प्रकाराची दखल घेत पथ्थनमथित्ताच्या जिल्हाधिकाºयांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
केरळच्या पथ्थनमथित्ता जिल्ह्यामधल्या एका शाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एसडीपीआयचे नेते मुनीर इब्नु नझीर आणि इतर दोघांविरोधात सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पालक-शिक्षक संघटनेनं देखील पोलिसांत तक्रार दाखल केली असून काही अज्ञात व्यक्ती शाळेच्या समोर उभ्या राहून विद्यार्थ्यांना आय एम बाबरी लिहिलेले बॅज लावत होते, असं सांगितलं आहे. भाजपानं या सगळ्याच्या मागे एसडीपीआय असल्याचं म्हटलं आहे.
एसडीपीआय ही पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया अर्थात पीएफआयची एक उपशाखा आहे. या प्रकरणातील सहभागाबद्दल पीएफआयविरोधात कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. कम्युनिस्ट्स आणि पीएफआय यांच्यातले संबंध उघड आहेत. केरळ दुसरा सीरिया होण्याच्या मार्गावर आहे. मुलांच्या अधिकाराचं हनन होऊ लागलं आहे. केरळला दहशतवाद्यांचं केंद्र बनवण्यासाठी सरकार इतरांना मदत करत आहे, अशी टीका भाजपाचे केरळ प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी राज्य सरकारवर केली आहे.
या प्रकरणाची राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली असून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणात दोषींविरोधात एफआयआर दाखल करण्याची देखील मागणी आयोगानं केली आहे. तसेच, या प्रकरणी तीन दिवसांमध्ये काय कारवाई करण्यात आली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App