विशेष प्रतिनिधी
कोहिमा : भारतीय सैन्याला विशेष आणि अधिकचे अधिकार देणारा अफ्सा कायदा रद्द करावा अशी मागणी नागालॅँड सरकारने केली आहे. अफ्सा कायदा देशावर काळा दाग असल्याचं म्हणत केंद्राने आता हा कायदा मागे घ्यावा असे म्हटले आहे.The Afsa Act is a black mark on the country, Nagaland government demands repeal of law giving special powers to army
ाारतीय सैन्याने कट्टरतावाद्यांविरोधात राबवलेल्या एक अभियानात केलेल्या गोळीबारात नागरिकांचा मृत्यू झाल्याने नागालँडमधील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. नागालँडच्या राज्य सरकारने सध्या तयार झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळाने नागालँडमधील अफ्स्पा कायदा रद्द करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला.
आता नागालँड सरकार याबाबत केंद्र सरकारला लेखी मागणी करणार आहे. या बैठकीत याशिवाय राज्यात सुरू असलेला प्रतिष्ठित हॉर्नबिल उत्सव देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एसआयटीला या प्रकरणाचा तपास १ महिन्यात करून अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले.
नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी सैनिकांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या अंत्यसंस्कारात देखील सहभाग घेतला. तसेच तेथेही नागालँडमध्ये अफ्स्पा कायदा नको, अशी भूमिका जाहीर केली. अफ्स्पा कायदा हा देशाच्या प्रतिमेवर काळा दाग आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केले.
नागालॅँडमधील प्रकाराबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, सैन्याला दहशतवादी येण्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. याआधारे सैन्याच्या २१ पॅराकमांडोच्या एका पथकाने ४ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी संशयित परिसरात सापळा लावले. त्यावेळी एक वाहन सापळा लावलेल्या ठिकाणाच्या जवळ आलं.
सैन्याने ते वाहन थांबवण्याचा इशारा केला. यानंतर वाहन थांबण्याऐवजी त्या ठिकाणाहून वेगाने पळून जात असल्याचं दिसले. यानंतर या वाहनात संशयित कट्टरतावादी जात असल्याच्या संशयावरून सैन्याने या वाहनावर गोळीबार केला. या गोळीबारात या वाहनातील ८ पैकी ६ जणांचा मृत्यू झाला. नंतर हे लोक कट्टरतावादी नसल्याचं समोर आलं आणि चुकीच्या लोकांवर गोळीबार झाल्याचं स्पष्ट झालं.
जखमी दोघांना सैन्यानेच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी सैन्याच्या या तुकडीला घेरत हल्ला केला आणि दोन वाहने जाळण्यात आली. यात सुरक्षा दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला, तसेच अनेक जवान जखमी झाले.
सैन्याला आपल्या सुरक्षेसाठी आणि जमाव पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. त्यात आणखी ७ नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच इतर काही जखमी झाले. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App