विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहूल गांधी यांचे जवळचे समजले जाणारे आणि त्यांच्या समर्थनार्थ सतत ट्विट करणारे साकेत गोखले यांनी तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल कॉँग्रेस हाच देशातील एकमेवर आक्रमक पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षांपेक्षाही ममता बॅनर्जी जास्त आक्रमक पध्दतीने लढत आहेत, असे म्हणत राममंदिराला विरोध करणारे कट्टर भाजपद्वेष्टे साकेत गोखले यांनी तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.New place for Modi haters: BJP hater and Rahul Gandhis supporter Saket Gokhale in Trinamool Congress
नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात गोखले यांनी तृणमूल कॉँग्रेसमध्ये सामील होत असल्याचे सांगितले. गोखले म्हणाले, तृणमूल कॉँग्रेस संसदेतील दुसºया क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. ममता बॅनर्जी विविध मुद्यांवर आक्रमक भूमिका घेतात. त्यामुळे माझी जाहीर पसंती ही तृणमूल कॉँग्रेसच होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री थेट समोर येऊन ज्या पध्दतीने लढत आहेत ते पाहून अशाच पक्षाचा मला शोध होता. त्यामुळे मी तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
साकेत गोखले हे कट्टर मोदीद्वेष्टे आणि भाजपा विरोधक म्हणून ओळखले जातात. ते ठाण्यातील रहिवासी आहेत. त्यांनी राममंदिर भूमिपूजनाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ते पत्रकार आहेत, त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी म्हणून काम केलंय. ते आरटीआय कार्यकर्ते देखील असल्याचे म्हणविले जातात. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात.
राहुल गांधीच्या समथार्नार्थ तसेच भाजप सरकारच्या धोरणांविरोधात ते ट्विटर लिहित असतात.अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे भूमीपूजन 5 आॅगस्ट २०२० रोजी झाले. मात्र या प्रस्तावित भूमीपूजनाला विरोध करण्याची मागणी करत साकेत गोखले यांनी एक याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. भूमीपूजन कोविड-19 च्या अनलॉक-2 गाईडलाईन्सचं उल्लंघन आहे, असे त्यांनी या याचिकेत म्हटले होते.
साकेत गोखले यांनी यापूर्वी माजी राजनयिक आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पूरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांची बदनामी करणारे ट्विट्स केले होते. ते हटविण्याचे आदेश देऊन दिल्ली उच्च न्यायालयाने गोखले यांना दणका दिला होता. साकेत गोखले हा समाजमाध्यमांवर खोटी माहिती प्रसारित करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App