नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी


विशेष प्रतिनिधी

काठमांडू : नेपाळचे विद्यमान पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मधेशी जनता समाजवादी पार्टीशी हातमिळवणी केली आहे. यामुळे त्यांची सत्तेवरील पकड घट्ट झाली आहे. मधेशी समाजाचे भारताशी चांगले संबंध आहे. या कृतीने ओली यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. Nepal PM k.p.oli did alliance with another party

विरोधकांनी मात्र या कृतीला विरोध केला आहे. संसद विसर्जित असताना आणि मध्यावधी निवडणूकीची तारीखही जाहीर झालेली असताना मंत्रिमंडळ विस्तार करणे घटनाविरोधी असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.


नेपाळ पोलिसांच्या मारहाणीत आठ भारतीय व्यापारी जखमी


ओली यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक एकत्र आले असून लोकप्रतिनिधीगृह विसर्जित केल्यानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोधालाही सामोरे जावे लागत आहे. विरोध कमी करण्यासाठी ओली यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करताना काही प्रमुख मंत्र्यांना दूर केले आहे. उपपंतप्रधान ईश्व र पोखारेल आणि परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावाली यांनाही डच्चू देण्यात आला आहे. त्यांनी आता मधेशी जनता समाजवादी पक्षातील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यांनी या पक्षातील दोन जणांना उपपंतप्रधान पद दिले आहे. यामुळे त्यांची सत्तेवरील पकड घट्ट झाली आहे.

Nepal PM k.p.oli did alliance with another party

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था