शायर की (अ)शायरी; मुनव्वर राणा म्हणाले, ओवैसींच्या मदतीने योगी मुख्यमंत्री झाल्यास मी यूपी सोडून जाईन!!


वृत्तसंस्था

लखनौ – लोकप्रिय शायर मुनव्वर राणा यांनी आपली (अ)शायरी प्रकट केली आहे. सातत्याने वादग्रस्त आणि जातीयवादी विधाने करणाऱ्या मुनव्वर राणांनी नवीन अंदाज ए (अ)शायरी केली आहे, की असदुद्दीन ओवैसींच्या मदतीने जर योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर मी उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन. Munnavar Rana says, he will leave UP if yogi aditya nath becomes CM again

मुनव्वर राणा एवढेच विधान करून थांबलेले नाहीत. तर त्यांनी उत्तर प्रदेश हे राज्य मुसलमानांच्या राहण्यासाठी योग्य राहिलेले नाही. मुसलमान ८ – ८ मुले जन्माला घालतात कारण त्यांना भीती वाटते, की त्यांची किमानन दोन मुले दहशतवादी म्हणून मारली जातील, अशी नवीन वादग्रस्त विधाने देखील मुनव्वर राणांनी केली आहेत.शनिवारी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुनव्वर राणांनी मोठी घोषणाच करून टाकली आहे. ते म्हणाले, की एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाला मुसलमानांनी मते दिली, तर त्यांच्या मतांमध्ये फूट पडेल. एकदा का मतांमध्ये फूट पडली तर त्याची फायदा योगी आदित्यनाथ यांनाच होईल. त्यामुळे योगी आदित्यनाथ पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. तसे झाले तर मी उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन.

भाजपा आणि ओवैसी हे असे दोन पहिलवान नूरा कुस्ती खेळून मुसलमानांच्या मतांमध्ये फूट पाडत आहेत. ते केवळ लोकांना दाखवण्यासाठी एकमेकांविरोधात लढत आहेत. प्रत्यक्षात त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण होते आणि त्याचा फायदा भाजपाला होतो. हाच भाजप आणि ओवैसी यांचा डाव असल्याचा आरोप मुनव्वर राणा यांनी केला आहे.

Munnavar Rana says, he will leave UP if yogi aditya nath becomes CM again

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी