तालिबानला पाहिजेत 15 वर्षांपुढील मुली आणि 45 पेक्षा कमी वयाच्या विधवा, मौलवींना मागितली यादी, दहशतवाद्यांशी लावणार लग्न

Taliban ask for list of girls above 15, widows under 45 to be married to their fighters Reports

Taliban ask for list of girls above 15 : अफगानिस्तान (Afghanistan) मध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा धुडगूस सुरूच आहे. ते अफगाणी सुरक्षा दलांवर सातत्याने हल्ला करत आहेत. यादरम्यान तालिबानतर्फे एक नवे फर्मान आले आहे. यानुसार त्यांना 15 वर्षांपुढील सर्व मुली आणि 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या सर्व विधवा महिलांची यादी मौलवींनी उपलब्ध करून द्यायची आहे. Taliban ask for list of girls above 15, widows under 45 to be married to their fighters Reports


वृत्तसंस्था

काबूल : अफगानिस्तान (Afghanistan) मध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा धुडगूस सुरूच आहे. ते अफगाणी सुरक्षा दलांवर सातत्याने हल्ला करत आहेत. यादरम्यान तालिबानतर्फे एक नवे फर्मान आले आहे. यानुसार त्यांना 15 वर्षांपुढील सर्व मुली आणि 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या सर्व विधवा महिलांची यादी मौलवींनी उपलब्ध करून द्यायची आहे.

महिलांवर तालिबानची वाईट नजर

द सनने दिलेल्या एका वृत्तानुसार, तालिबान्यांनी असेही आश्वासन दिले आहे की या महिलांनी त्यांच्या सैनिकांशी लग्न केल्यानंतर ते पाकिस्तानच्या वझिरीस्तानला पाठवतील. मुलगी मुस्लिम नसल्यास तिचे धर्म परिवर्तन केले जाईल. खरेतर तालिबानला या महिलांना त्यांच्या सैनिकांचे गुलाम बनवायचे आहे. असंख्य तालिबानी या महिलांचा लैंगिक छळ करतील.

तालिबान्यांनी मागितली यादी

तालिबानी सांस्कृतिक आयोगाने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, सर्व इमाम व मौलवी यांनी तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागात राहत असलेल्या 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व 45 वर्षांखालील विधवा महिलांची यादी सादर करावी. या महिलांना तालिबानी सेनेच्या ताब्यात देण्यात येईल.

तालिबानी दहशतवाद्यांचे हल्ले वाढले

अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांतील सैनिक अफगाणिस्तानातून बाहेर पडत आहेत आणि त्याचा फायदा घेत तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ले तीव्र केले आहेत. एका अहवालानुसार अफगाणिस्तानातील 85 टक्के भूभाग तालिबान्यांनी ताब्यात घेतला आहे.

महिलांना एकट्याने घर सोडण्यास बंदी

तालिबान्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेल्या भागात शरिया कायदा लागू केला आहे. येथे आता धूम्रपान, दाढी कापणे आणि स्त्रियांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Taliban ask for list of girls above 15, widows under 45 to be married to their fighters Reports

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात