राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात टिप्पणी करणे जावेद अख्तर यांनी भोवले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात वकील संतोष दुबे यांनी एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.Mumbai police registered an FIR against lyricist Javed Akhtar over his alleged remark against the RSS
वृत्तसंस्था
मुंबई : गीतकार जावेद अख्तर सतत चर्चेत असतात. प्रत्येक मुद्द्यावर ते आपले मत नेहमी व्यक्त करत असतात. यामुळे अनेकदा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात टिप्पणी करणे जावेद अख्तर यांनी भोवले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना केली होती.
त्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात वकील संतोष दुबे यांनी एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
वकील संतोष दुबे यांनी पीटीआयला सांगितले की, मी यापूर्वी जावेद अख्तर यांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगितले होते, पण त्यांनी काहीही केले नाही. आता माझ्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
100 कोटींची भरपाई
वकील संतोष दुबे यांनी यापूर्वी म्हटले होते की, जर जावेद अख्तर यांनी बिनशर्त लेखी माफी आणि नोटीसला सात दिवसांच्या आत प्रतिसाद दिला नाही, तर ते नुकसान भरपाई म्हणून 100 कोटी रुपये मागून त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करतील. ते म्हणाले होते की, जावेद अख्तर यांनी केलेले वक्तव्य आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत गुन्हा आहे.
काय म्हणाले होते जावेद अख्तर?
रिपोर्ट्सनुसार, जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, आरएसएसचे समर्थन करणाऱ्या लोकांची मानसिकता तालिबानसारखीच आहे. या संघाचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. तुम्ही पाठिंबा देणाऱ्यांमध्ये आणि तालिबानींमध्ये काय फरक आहे?
जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतरच अनेकांनी त्यांना लक्ष्य केले. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले. त्याचवेळी जावेद अख्तर यांनी ऑगस्टमध्ये ट्विट करून ज्यांनी तालिबानचे समर्थन केले त्यांना खेचले होते. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App