या प्रकरणी दोघेजन ताब्यात घेतले असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संगमनेरातील कत्तलखाने राज्यात प्रसिद्ध आहेत.Big news: The biggest slaughterhouse operation in the state
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे .
या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि ४ लाख २८ हजार रुपयांची रोकड देखील जप्त केली गेली. तसेच या कारवाईत ७१ जिवंत गोवंश जनावरांना जीवदान मिळाले.तर तब्बल ३१ हजार किलो गोमांस कारवाईत आढळुन आले आहे.
याशिवाय कत्तलीसाठी जनावरांची वाहतुक करणारी वाहनेदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी दोघेजन ताब्यात घेतले असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संगमनेरातील कत्तलखाने राज्यात प्रसिद्ध आहेत.
येथील कत्तलखान्यातून राज्यभरात गोमांस पुरविले जाते; मात्र स्थानिक पोलीस अपवाद वगळता या कत्तलखान्यावर कारवाई करतांना आढळत नाही. तत्कालिन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी या कत्तलखान्यावर सर्वप्रथम कारवाईचे धाडस दाखविले होते.
त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत २०० जिवंत जनावरांची सुटका करण्यात आली तर हजारो किलो गोमांस ताब्यात घेण्यात आले होते. राज्यातील ती सर्वात मोठी कारवाई ठरली होती. त्यापाठोपाठ रविवारची कारवाई मोठी ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more