Aryan Khan Drugs Case: आर्यन खान दोषी सिद्ध झाल्यास इतक्या वर्षांची होऊ शकते शिक्षा, एवढा दंडही भरावा लागू शकतो


प्रतिनिधी

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या एनसीबीच्या कचाट्यात अडकलेला आहे. एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो) ने ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. आर्यन खानवर क्रूझ रेव्ह पार्टीमध्ये सहभागी झाल्याचा आरोप आहे. NCBने शनिवारी रात्री मुंबईत एका क्रूझवर छापा टाकला होता, जेथे रेव्ह पार्टी चालू होती.Aryan Khan Drugs Case booked under ndps act section 27 which attracts a maximum punishment of one year

आर्यनसह 8 जण अटकेत

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंटदेखील पार्टीला उपस्थित असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत रविवारी एनसीबीने या सर्वांना एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक केली. सध्या आर्यन खान एक दिवसासाठी एनसीबीच्या ताब्यात आहे. एनसीबीच्या मते, कोकेन, चरस आणि एमडीसारखे अंमली पदार्थ आर्यन खानसह इतरांजवळ आढळले.दोषी ठरल्यास एक वर्षापेक्षा जास्त तुरुंगवास

या सर्वांना एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर, आर्यन खानसह सर्व आरोपींविरुद्ध नारकोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्ट (एनडीपीएस) कलम 8-सी, 20-बी, 27 आणि 35 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कलमानुसार, ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांना एक वर्षापेक्षा जास्त कारावास किंवा 20 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

आर्यन आमंत्रणावर गेल्याचा दावा

न्यायालयात हजर असताना फिर्यादीचे वकील अद्वैत सेठना यांनी आर्यनला दोन दिवसांसाठी एनसीबी कोठडीत पाठवण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने केवळ एका दिवसाची कोठडी दिली. आर्यनचे वकील सतीश माने शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की, आर्यनच्या नावाने क्रूझवर कोणतेही केबिन बुक किंवा सीट नाही. त्याच्याकडे बोर्डिंग पासही नव्हता. तो फक्त आमंत्रणावर तिथे गेला. त्याला फक्त व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे अटक करण्यात आली आहे.

क्रूझ कंपनीकडून खुलासा

दरम्यान, ज्या क्रूझवर रेव्ह पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला आहे त्याचे नाव कार्डेलिया क्रूझ आहे. त्याची ऑपरेटर कंपनी वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेड आहे. कार्डेलिया क्रुझचा रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नाही, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जर्गेन बेलम यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जर्गन बेलम यांनी सांगितले की, एका खासगी कार्यक्रमासाठी दिल्लीतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने ती भाड्याने घेतली होती. कार्डेलिया क्रूझ ही एक कौटुंबिक मनोरंजन कंपनी आहे. ही घटना कंपनीच्या भूमिकेच्या विरुद्ध आहे. कंपनी या घटनेचा तीव्र निषेध करते. बेलम यांनी म्हटले आहे की त्यांची कंपनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करेल.

Aryan Khan Drugs Case booked under ndps act section 27 which attracts a maximum punishment of one year

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण