विशेष प्रतिनिधी
मुंबई : आर्यन खान आणि त्याच्या सहा मित्रांना नुकताच एनसीबीने ड्रग प्रकरणामध्ये अटक केली आहे. ड्रग्स खरेदी करणे, पुरवणे या प्रकरणात आर्यन खानला संभाव्य आरोपी म्हणून एनसीबीने ताब्यात घेतले आहे. या संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी कोर्टाकडे केली आहे.
NCB demands 7 days custody of aryan khan, suspects international drug smuggling
आर्यनच्या फोनवरून आक्षेपार्ह मजकूर जप्त करण्यात आल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे तो ड्रग्जची खरेदी विक्री करण्याचा विचारदेखील करत होता, ड्रग्ज तस्करीचे पुरावे सापडले असल्यामुळे त्याची कोठडी 11 ऑक्टोबरपर्यंत देण्यात यावी अशी मागणी एनसीबी द्वारे कोर्टाकडे करण्यात आली आहे. आर्यन खानसोबत अर्णब मर्चंट आणि मुनमुन धमीजा यांना देखील अटक करण्यात आली होती.
AARYAN KHAN DRUGS CASE: Cruise Party मध्ये आर्यन खानने केलं होत ड्रग्सचं सेवन : NCB
या सर्व प्रकरणावर आर्यन खानचे वकील सतीश माणेशिंदें यांनी कोर्टासमोर मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे,
आर्यन हा क्रूजवर पार्टी करण्यासाठी गेला नव्हता तर त्याला गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आणि गेस्ट म्हणून गेल्यामुळे त्याला कोणता केबिन देण्यात येणार आहे हे देखील त्याला माहीत नव्हते.
क्रूझवर जाण्यासाठी आर्यनने एक पैसाही घेतला नव्हता. जो पंचनामा तयार करण्यात आला आहे त्यामध्येदेखील स्पष्ट सांगितले आहे की, आर्यनकडून फक्त मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या बाकी गिरफ्तार केलेल्या मित्रांकडून सहा ग्रॅम चरस जप्त करण्यात आली होती.
न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यासाठी जे पुरावे दाखवले जात आहेत, ते आर्यनकडून जप्त केले नाहीयेत. तर दुसऱ्या आरोपींकडून जप्त केलेले आहेत. चौकशी अंतर्गत फक्त व्हॉट्सअँप चॅट डाऊनलोड केले गेले होते. आणि त्याच्यावरुन आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रफिकिंग चा संबंध जोडण्यात आला आहे.
आर्यनने जितकी वर्ष परदेशामध्ये घालवली आहेत, त्या पूर्ण वर्षांमध्ये कधीही त्याने ड्रग्ज ट्राफिकिंग किंवा सप्लाई अशा कोणत्याच गोष्टींमध्ये त्याचा सहभाग नव्हता. डाऊनलोड केलेल्या चॅट्स आणि पिक्चर्स वरून हे स्पष्ट होते.
ड्रग्सच्या संबंधित जर आर्यनचे नाव मर्यादा पुढे येत असेल तर त्याचा संबंध ड्रग्ज ट्राफिकिंगशी जोडला जाऊ नये. रिया चक्रवर्तीच्या केसमध्ये 27 ए ही धारा हटवण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयीन कोठडी न देता जमानत दिली जावी.
सतीश मानेशिंदे यांनी कोर्टाला असेही सांगितले की, वॉट्सअप चाटवरून कोणालाही दोषी मानणे चुकीचे आहे. याआधी झालेल्या केसमध्ये देखील असेच झाले होते. या घटनांचा संदर्भ देत त्यांनी कोर्टाला आर्यनची जमानत मंजूर केली जावी हे सांगितले.
या सर्व प्रकरणावरून शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यावर एनसीबीची रेड पडू शकते असे देखील म्हटले जात आहे. आर्यनच्या मोबाइल चॅटिंगमधून क्रूझमधील काही मॅनेजमेंट टीमच्या सदस्यांची नावे समोर आली होती. एसीबीने पुन्हा या क्रूझवर रेड टाकून या सहा जणांना चौकशीसाठी अटक केले आहे. या सर्व प्रकरणानंतर शाहरुख खानचे आपल्या मुलासोबत दोन मिनीट बोलणे झाले होते. एनसीबीच्या सूत्रांनुसार आर्यनला लँडलाइन फोनवरुन आपल्या वडिलांना फोन करण्याची परवानगी देण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App