वृत्तसंस्था
बेल्जियम : ओमीक्रोन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांना विरोध केला जात असून हिंसाचार उफाळून आला आहे. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक आणि फटके फोडून निर्बंधाना विरोध तीव्र केला आहे. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करू गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे. Movement against omikron restrictions in Belgium, People take to the streets; protesters throw stones
दारम्यान, युरोपात ओमीक्रोनने थैमान घातले आहे. इटलीमध्येही रोज १४ ते १५ हजार रुग्ण आढळत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत हा आकडा १५ टक्क्यांनी अधिक आहे. ऑस्ट्रेलियामध्येही लस समर्थक आणि विरोधकांनी आमने-सामने येऊन आंदोलन करत आहेत. ओमायक्रॉन हा नवीन विषाणू आतापर्यंत ३८ देशांमध्ये पसरला आहे. मात्र, अद्याप एकाही व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. फार जास्त प्रमाणात म्युटेशन म्हणजेच रचनेमध्ये बदल होणारा हा विषाणू नक्की किती धोकादायक आहे, याची माहिती मिळण्यासाठी अनेक आठवडे जातील, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देशक मायकल रायन यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App