जवान अविनाश शहिद झाल्याची बातमी कळताच हिंगणे गावासह राज्यभर शोककळा पसरली आहे. Beed’s son Avinash dies blindly; Funeral will be held at Government Itama this afternoon
विशेष प्रतिनिधी
बीड : दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना असताना महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील हिंगणी गावातील सुपुत्राला वीरमरण आले आहे.अविनाश कल्याण आंधळे (वय २९) असे या जवानाचे नाव आहे.शहिद जवान अविनाश यांचे पार्थिव आज दुपारी त्यांच्या मुळ गावी हिंगणी येथे दिल्लीहून आणले जाणार असून त्यांच्या पार्थिवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
जवान अविनाश शहिद झाल्याची बातमी कळताच हिंगणे गावासह राज्यभर शोककळा पसरली आहे. शहिद जवान अविनाश ६ वर्षापासून देशसेवा बजावत होते.शहिद अविनाश यांच्या जाण्याने कुटुंबीयावर मोठे संकट ओढावले आहे. शहिद जवान अविनाश त्यांचे वडिल शेतकरी आहेत त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App