ओमीक्रोन व्हेरिएंट : कोल्हापूर मध्ये १५ ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्यात आले


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोरोणाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंट मुळे आख्ख्या जगभर चिंता वाढवली आहे. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील प्रत्येक जिल्ह्याला धोक्याचा इशारा दिला आहे आणि योग्य त्या सोयीसुविधांची जुळणी करण्याची सूचना दिलेली आहे.

Omicron variant: New 15 oxygen generating plants in Kolhapur

या पाश्र्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती दिली की, कोल्हापूरमध्ये 15 ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्यात आले आहेत. यामुळे 1200 लिटर पर मिनिट इतका ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता झाली आहे. एकूण निर्माण केला जाणारा ऑक्सिजन 111 टन इतका असेल. जर तिसरी लाट आली तर ऑक्सिजनचा पुरवठा अजिबात कमी पडणार नाही. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.


Omicron Varient: दक्षिण अफ्रिकेसह इतर देशातून मुंबईत २८६८ प्रवासी दाखल ; ९ जण कोरोना पॉझिटिव्ह!


त्याचप्रमाणे 100 ऑक्सिजन बेडची देखील सोय करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे क्वारंटाइन सेंटर्स देखील सुरू करण्यात आले आहेत. कोणतेही नवे सेंटर्स बनवण्यावर आता भर दिला जात नाहीये तर याआधी जे होते त्यांनाच अँक्टिव्हेट करण्यास भर दिला जात आहे. असे रेखावर यांनी यावेळी सांगितले आहे.

Omicron variant: New 15 oxygen generating plants in Kolhapur

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात