Omicron Varient: दक्षिण अफ्रिकेसह इतर देशातून मुंबईत २८६८ प्रवासी दाखल ; ९ जण कोरोना पॉझिटिव्ह!


  • कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
  • या प्रवाशांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी केली जाणार आहे. तसंच नव्या व्हायरसची माहिती देणारी एस-जिन तपासणी (S-gin Test) केली जाणार आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने संपूर्ण जगात भिती निर्माण झाली आहे. या व्हायरसमुळे जगभरातील सर्वच देश सतर्क झाले आहेत. बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रवाश्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. मुंबई विमानतळावर सुद्धा बाहेरच्या देशातून आलेल्या प्रवाश्यांची कोरोना तपासणी केली जात आहे.Omicron Varient: 2868 passengers arriving in Mumbai from other countries including South Africa; 9 corona positive!

ओमिक्रॉन संक्रमित दक्षिण अफ्रिकेसह इतर देशांमधून मुंबईत २८६८ प्रवासी दाखल झाले आहेत. यापैकी ४८५ प्रवाश्यांची कोरोना तपासणी करण्यात आली तर यामधील ९ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.दक्षिण अफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे.

या व्हायरसच्या भीतीने याठिकाणी कामानिमित्त गेलेले भारतीय नागरिक पुन्हा आपल्या मायदेशी परतू लागले आहेत. या देशांमधून आलेले प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मुंबई महानगर पालिकेकडून देखील बाहेरच्या देशातून गेल्या महिन्यात मुंबई आलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.महापालिकेने ओमिक्रॉन संक्रमित ४० देशातून आलेल्या प्रवाशांची यादी तयार केली असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या प्रवाशांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी केली जाणार आहे. तसंच नव्या व्हायरसची माहिती देणारी एस-जिन तपासणी (S-gin Test) केली जाणार आहे.

या चाचण्यांचा रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. एकदा की अहवाल आला की पुढील कारवाई करण्यासाठी दिशा मिळेल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश कोकाणी यांनी सांगितले.भारतामध्ये ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. कर्नाटकामध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत.

Omicron Varient: 2868 passengers arriving in Mumbai from other countries including South Africa; 9 corona positive!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण