जगभर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने खळबळ , HIV च्या विषाणुमुळे आला ओमिक्रॉन ; अफ्रिकेत आढळून आले काही रुग्ण


व्हायरसच्या इतर व्हेरियंटना देण्यात आलेल्या अल्फा आणि डेल्टा अशा ग्रीक नावांप्रमाणे या व्हेरियंटला Omicron – ओमायक्रॉन नाव देण्यात आलंय.A new variant of the corona has caused a stir around the world. Some patients were found in Africa


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मागील दोन वर्षापासून जगभरात कोरोनाने चांगलच थैमान घातलं होत.दरम्यान सध्या हळूहळू परिस्थिती आटोक्यात आली होती. सगळे निर्बंध शिथिल करण्यात आले होते.दरम्यान आता या कोरोनाच्या संकटात मोठी भर पडली .कोरोनाच्या या नव्या विषाणूला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं आहे. व्हायरसच्या इतर व्हेरियंटना देण्यात आलेल्या अल्फा आणि डेल्टा अशा ग्रीक नावांप्रमाणे या व्हेरियंटला Omicron – ओमायक्रॉन नाव देण्यात आलंय.

अफ्रिकेत याचे काही रुग्ण आढळून आले आहेत.कोरोनाचा हा नवा विषाणू पहिल्या विषाणुपेक्षा ३० पट अधिक वेगानं पसरत असल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे सर्वात जास्त धोकादायक विषाणू असल्याचं बोललं जातंय.



दरम्यान लंडनमधील यूसीएल जेनेटीक इंस्टीट्यूटच्या एका वैज्ञानिकाच्या म्हणण्यानुसार हा व्हेरिएंट एखाद्या HIV रुग्णाच्या इम्यूनो कंप्रोमाईज्ड व्यक्तीपासून क्रोनल इन्फेक्श झालं असेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

सरकार काय उपाययोजना करत आहे?

पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. भारतात या व्हेरीयंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र व्हेरीयंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून भारतात होणारी विमान वाहतूक रद्द करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

दक्षिण अफ्रिकेसह इतर काही देशातून येणाऱ्या लोकांना १४ दिवस क्वारंटाईन करुन ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना ४८ तासांच्या आत कोरोना चाचणीचा अहवाल देणं बंधनकारक असणार आहे.

A new variant of the corona has caused a stir around the world,Some patients were found in Africa

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात