मोदींची जादू कायम, आता लोकसभा निवडणुका झाल्या तरी भाजपच स्पष्ट बहुमताने सत्तेवर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात मोदी नावाची जादू कायम आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेनुसार देशात आता निवडणुका झाल्या तरी भारतीय जनता पक्षच बहुमताने सत्तेवर येणार आहे.Modi’s magic remains, if Lok Sabha elections have taken place toady BJP will be in power with a clear majority

‘मूड ऑफ द नेशन’ या नावाने ही जनमत चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आता लोकसभा निवडणूक झाली तर भाजप व मित्रपक्षांना २९६ जागांसह स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्व्हेक्षणात विविध प्रश्नांवर जनमताचा कानोसा घेण्यात आला.भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला २९६ जागांसह स्पष्ट बहुमत मिळेल तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला ( यूपीए ) १२७ जागा आणि इतर पक्षांना १२० जागा मिळतील, असा अंदाज या चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. मतांच्या टक्केवारीत एनडीए सर्वात पुढे असेल.

४० टक्के मते एनडीएच्या खात्यात जाऊ शकतात. त्यानंतर इतर पक्षांना ३२ टक्के तर युपीएला २६.७ टक्के मते मिळतील, असा अंदाज असून मते कमी मिळाली तरी यूपीएच्या जागा इतर पक्षांच्या तुलनेत जास्त असणार असे दिसत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारला असता ५९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. २६ टक्के लोकांनी नकारात्मक मत नोंदवले आहे. पंतप्रधानपदावर कोणता नेता असावा असे विचारले असता ५३ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिला असून ७ टक्के मते राहुल गांधी, ६ टक्के मते योगी आदित्यनाथ तर ४ टक्के मते अमित शहा यांना मते दिली आहेत.

प्रमुख विरोधी पक्षनेता म्हणून १७ टक्के लोकांनी ममता बॅनर्जी, १६ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल आणि ११ टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दर्शविली आहे.पंतप्रधान मोदी यांचे उत्तराधिकारी कोण असावेत, असा प्रश्न विचारला

असता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली. २४ लोकांनी शहा हे मोदींचे उत्तराधिकारी म्हणून योग्य वाटतात. मात्र त्यापेक्षा केवळ एक टक्का म्हणजे २३ टक्के कमी लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाला पसंती दर्शवली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ११ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Modi’s magic remains, if Lok Sabha elections have taken place toady BJP will be in power with a clear majority

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!