Remdesivir Import Duty Free : कोरोना महामारीच्या संकटाला देश सामोरे जात आहे. यामुळे उपचारांत जीवनरक्षक ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे चिंता वाढली होती. परंतु केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करत या इंजेक्शनच्या उत्पादन वाढीबरोबरच याच्या किमतीत मोठी कपात नुकतीच केली आहे. एवढेच नाही, आता मोदी सरकारने या जीवनरक्षक इंजेक्शनवरील आयात शुल्क हटवल्याने रेमडेसिव्हिर आणखीन स्वस्त होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारने घोषणा केली की, रेमडेसिव्हिर एपीआय, रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि बीटा सायक्लोडेक्सट्रिन (रेमडेसिव्हिर निर्मितीसाठी याचा वापर होतो) यांच्यावरील आयात शुल्क पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. Modi Govt Big Dicision Now Remdesivir Import Duty Free, Prices Will Drop more, Supply Also Increased
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटाला देश सामोरे जात आहे. यामुळे उपचारांत जीवनरक्षक ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे चिंता वाढली होती. परंतु केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करत या इंजेक्शनच्या उत्पादन वाढीबरोबरच याच्या किमतीत मोठी कपात नुकतीच केली आहे. एवढेच नाही, आता मोदी सरकारने या जीवनरक्षक इंजेक्शनवरील आयात शुल्क हटवल्याने रेमडेसिव्हिर आणखीन स्वस्त होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारने घोषणा केली की, रेमडेसिव्हिर एपीआय, रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि बीटा सायक्लोडेक्सट्रिन (रेमडेसिव्हिर निर्मितीसाठी याचा वापर होतो) यांच्यावरील आयात शुल्क पूर्णपणे हटवण्यात आले आहेत.
पीयूष गोयल यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली. पीयूष गोयल आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठाही वाढेल आणि सोबतच याच्या उत्पादन खर्चातही घट होईल. अशा प्रकारे सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना बाधित रुग्णांना मोठी मदत होईल.
In line with PM @NarendraModi's priority to ensure affordable medical care for COVID-19 patients, imports of Remdesivir API, injection and specific inputs have been made import duty free. This should increase supply and reduce cost thus providing relief to patients. pic.twitter.com/F40SX8mNeS — Piyush Goyal (मोदी का परिवार) (@PiyushGoyal) April 20, 2021
In line with PM @NarendraModi's priority to ensure affordable medical care for COVID-19 patients, imports of Remdesivir API, injection and specific inputs have been made import duty free. This should increase supply and reduce cost thus providing relief to patients. pic.twitter.com/F40SX8mNeS
— Piyush Goyal (मोदी का परिवार) (@PiyushGoyal) April 20, 2021
काही दिवसांपासून अनेक राज्यांत रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याचा मुद्दा समोर आला होता. यामुळे आता सरकारने इंजेक्शनचा तुटवडा आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिरची उत्पादन क्षमता दुप्पट करण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत 38.8 लाख रेमडेसिव्हिर इंजेक्शन दर महिन्यात तयार होत होते. आता हेच प्रमाण 78 लाखांपर्यंत वाढवण्यास सांगण्यात आले आहे.
Modi Govt Big Dicision Now Remdesivir Import Duty Free Prices Will Drop more, Supply Also Increased
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App