मुंबईत पर्यटक कोरियन युवतीला छेडणाऱ्या मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारी यांना अटक


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईत पर्यटनाला आलेल्या आणि खार परिसरात लाईव्ह युट्युब स्ट्रीमिंग करणाऱ्या एका कोरियन युवतीला छेडल्याबद्दल मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्रेलाम अन्सारी या दोन तरुणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित कोरियन युवती ही भारतात पर्यटनाला आली आहे. ती मुंबईत खार परिसरात युट्युब लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना दोन तरुण तिच्यापाशी आले. Mobeen Shaikh and Mohammad Ansari arrested for molesting a tourist Korean girl in Mumbai

एकाने तिचा हात धरला आणि तिला आपल्या स्कूटर वर बसण्याचा आग्रह केला. दुसरा त्यावेळेस स्कूटर पाशी उभा होता. त्यानेही तिला स्कूटर वर बसण्याचा आग्रह करून तुला पाहिजे तिथे सोडतो म्हणाला. यापैकी एका युवकाने तर तिचा किस घेण्याचाही प्रयत्न केला. परंतु या युवतीने कोरियन युवतीने या दोन्ही तरुणांची मानसिकता ओळखून ताबडतोब त्यांना नकार दिला आणि ती बाजूला गेली. त्यानंतर या दोघांनी तिचा काही वेळ पाठलाग केला.

 

पण हा सगळ्या प्रकाराचा एकाने व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या प्रकाराबद्दल कोरियन युवतीने कोणती तक्रार दिली नाही. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर रजिस्टर झाला आणि फौजदारी कलमाच्या 354 नुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संबंधित व्हिडिओच्या आधारे त्या दोन्ही युवकांना शोधून काढले. त्यांची नावे मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्रेलाम अन्सारी अशी असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांनाही खार पोलिसांनी अटक केली आहे.

Mobeen Shaikh and Mohammad Ansari arrested for molesting a tourist Korean girl in Mumbai

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण